सराफ लुटीतील आरोपींना ३ दिवस पोलीस कोठडी

 

पाथर्डी – शहरातील सराफ बंडू चिंतामणी यांना लुटल्या बाबत पोलिसांनी पकडलेल्या तीनही आरोपींना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी न्यायाधीश मयूरसिंह गौतम यांच्यासमोर हजर केले असता तीनही आरोपींना पुढील तपासकामी १ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील सराफ बंडूशेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी यांना अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून लुटल्या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपी विशाल शिवाजी एडके रा.पाथर्डीदीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे या तीन चोरट्यांना ताब्यात घेवून रविवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मयूरसिंह गौतम यांच्या समोर हजर केले यावेळी सरकारी वकील प्रज्ञा गीते यांनी तसेच तपासी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक सचिन लिमकर यांनी आरोपीने आणखी कोणाच्या मदतीने गुन्हा केला,गुन्ह्यातील हत्यार तसेच आणखी किती गुन्हे केले याबाबत पुढील तपास करने असल्याने तीनही आरोपींना ७ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली त्यानुसार न्यायाधीश मयूरसिंह गौतम यांनी तीनही आरोपींना १ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

Post a Comment

0 Comments