पाथर्डी – शहरातील सराफ बंडूशेठ
उर्फ राजेंद्र चिंतामणी यांना अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून लुटल्या प्रकरणी
पाथर्डी पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपी विशाल शिवाजी एडके रा.पाथर्डी, दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक
तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे या तीन चोरट्यांना गजाआड केले आहे.
बंडूशेठ चिंतामणी हे गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी
७.३० वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी निघाले
असता त्यांचा शेवगाव रोड लगत असलेल्या ओढ्या जवळ अज्ञात चोरट्यांनी दुचाकी गाडी
अडवून त्यांच्या कडील पिशवी हिसकावली त्यावेळी सुवर्णकार चिंतामणी यांनी त्यास
विरोध केला असता अध्यात चोरट्यांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी चिंतामणी
त्यांच्या डोक्यावर वार केल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले होते तसेच या
हल्ल्याचा निषेध करत शुक्रवारी शहरातून पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढून
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून
पोलीस सहकाऱ्यासह तालुक्यातील संशयीतावर नजर करडी केली होती. त्याच अनुषगाने
गोपनीय खबऱ्या मार्फत शहरातील आरोपी विशाल शिवाजी एडके याच्या गुन्हा घडल्याचे
वेळे दरम्यान संशयित हालचाली बाबत माहिती मिळाली होती त्यानुसार एडके याच्याकडे पोलिसांनी
चौकशी केली मात्र एडके हा उडवा उडवीचे उत्तरे देत होता मात्र पोलिसांनी त्यास पोलिसी
खाक्या दाखवताच आरोपी
विशाल एडके याने आरोपी दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक तोताराम सोमनकर रा.राघू
हिवरे यांच्या मदतीने सराफ चिंतामणी यांच्यावर आठ दिवस पाळत ठेवून संगनमत करून मिळून
सराफ लुटीचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार पाथर्डी पोलीस निरीक्षक सुहास
चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,रामेश्वर कायंदे,पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे,पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप,निलेश म्हस्के,संदीप गर्जे,देविदास
तांदळे,अतुल शेळके,राहुल निमसे,राहुल तिकोने,संदीप कानडे,,ईश्वर
बेरड,लक्ष्मण पवार,ज्ञानेश्वर रसाळ,संदीप बडे आदीनी शिताफीने सर्व आरोपींना पकडले असून पुढील तपास सुरु आहे.
आरोपीने बनवले आंदोलक दोन पुढार्यांना मामा ! सराफ लुटीच्या घटनेचा निषेध
करण्यासाठी आंदोलनात पोलिसांवर आरोपाच्या फैरी झाडून अपशब्द वापरणाऱ्या दोन माजी
पदाधिकारी यांचा एक आरोपी जवळचा नातेवाईकच (भासा) निघाल्याने आंदोलनात पोलिसावर आरोपाचे
तोंडसुख घेणारे पुढारी यांना मात्र आरोपीने ऐनवेळी मामा बनवल्याची चर्चा पोलिसी
वर्तुळात ऐकायला मिळत असून हा किस्सा विनोदाचा विषय बनला आहे.
आंदोलक करणार पोलीस पोलीस निरीक्षकांचा सत्कार ! सराफ लुटी नंतर पोलीस ठाण्यावर निघालेल्या मोर्चात सात दिवसात आरोपी पकडल्यास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांचा नागरी सन्मान करणार असल्याचे सांगितले होते त्यानुसार अवघ्या २४ तासात आरोपी पकडण्यात आले त्यामुळे रविवारी सकाळी पाथर्डी ग्रामस्थांच्या वतीने सुहास चव्हाण यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
0 Comments