पाथर्डी - मुली मुलांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या
तरी सोशल मिडियाच्या अतिरेकामुळे मुलींवर अत्याचार व अन्याय होताना दिसतात. हे
टाळण्यासाठी मुलींनी शारीरिक,
मानसिक, भावनिक आरोग्याच्या विकासातून
निर्भयतेकडे वाटचाल करावी. स्वसंरक्षण करता येणे ही मुलींसाठी काळाची गरज बनली
आहे. जर मुलींना संरक्षण करता आले तर त्या कुठेही निर्भयपणे वावरू शकतात असे
प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीषा खेडकर
यांनी केले.
त्या येथील बाबुजी
आव्हाड महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय निर्भयकन्या अभियान कार्यशाळेचे उद्घाटन
प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख डॉ. बबन चौरे तर
व्यासपीठावर डॉ. सुभाष शेकडे,
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. भगवान
सांगळे, प्रा.सुरेखा चेमटे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या
दुसऱ्या सत्रात पोलीस कॉन्स्टेबल संदीप गर्जे यांनी महिला आणि कायदा या विषयावर
मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी कायद्याचे ज्ञान घेतले पाहिजे व योग्य वेळी
त्याचा वापर पाहिजे. आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा दिला पाहिजे. कायदे
हे विद्यार्थिनीच्या बाजूने आहेत असे सांगून विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या
कायद्याची माहिती दिली.तिसऱ्या सत्रात कराटे प्रशिक्षक अंबादास साठे यांनी
विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. याविषयी
प्रात्यक्षिकासह विवेचन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भगवान सांगळे, सूत्रसंचालन डॉ.
वैशाली आहेर तर आभार डॉ.अशोक डोळस यांनी मानले.
0 Comments