पाथर्डी - पार्थ
विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी येथे नुकतेच
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झी टीव्ही सारेगमप फेम लिटल चॅम्प विजेती
ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी ज्ञानेश्वरी
गाडगे या बालगायिकेने अतिशय उत्कृष्ट आवाजात उपस्थित विद्यार्थी व प्रेक्षक
रसिकांना विविध गीते सादर करून मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करताना सांगितले, की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात मार्गदर्शन घेऊन
करिअर करावे. तसेच त्यासाठी अधिकाधिक सातत्याने परिश्रम करावे. स्वतःच्या आवडीप्रमाणे
स्वतःला घडविल्यास जीवनात कधीही अपयश येणार नाही असे यावेळी सांगितले.
यावेळी संस्थेचे
अध्यक्ष अभय आव्हाड यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले, की देशाचे भवितव्य उज्वल आणि सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
अधिक सदृढ,अष्टपैलू आणि चौकस बनले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर
गरजेपुरता करून वाचन,लेखन,
खेळ यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांना
भविष्यात उपयोगी पडेल असे सर्वांगीण शिक्षण देण्याचा विद्यालयाचा व संस्थेचा
प्रयत्न राहील असे यावेळी सांगितले.
याप्रसंगी
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, बाल गायिका
ज्ञानेश्वरी गाडगे, संस्थेचे उपाध्यक्षअँड. सुरेशराव आव्हाड संस्थेचे विश्वस्त सुनील
साखरे, हाजी शाहीन मुनीर आतार, संगीत विशारद गणेश
गाडगे,कार्तिकी गाडगे,प्राचार्य डॉ.जी. पी.ढाकणे, माजी मुख्याध्यापक अश्फाक सय्यद, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक शरद मेढे,प्राथमिक विभाग
मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, पर्यवेक्षक संपत
घारे,समन्वयक ज्ञानेश्वर गायके, प्रोफेसर हनुमंत
पाटील, महेंद्र तांदळे व बहुसंख्येने पालक तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पारितोषिक वितरण
कार्यक्रमामध्ये विद्यालयातील माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा, गणित विज्ञान
प्रदर्शन, डॉ.सी. व्ही. रमण स्पर्धा परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षा तसेच
राज्यस्तर-विभागस्तर- व जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त ५३५
विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केले. वार्षिक शैक्षणिक अहवाल वाचन
मुख्याध्यापक शरद मेढे,
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा
सातपुते व अर्चना दराडे यांनी केले तर आभार अनुजा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश डोळे,अभिजीत सरोदे, विठ्ठल धस,
संदीप धायतडक,दीपक राठोड, रावसाहेब मोरकर,प्रमोद हंडाळ, शरद बुधवंत,सोनिका वखरे, रत्नमाला सांगळे, स्नेहल बोराडे, रजनी भोईटे, माधुरी रणदिवे, अनिता केदार,सतीश बोरुडे,नंदकुमार झेंड, योगेश विधाटे,यांनी परिश्रम केले.
0 Comments