पाथर्डी - शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या जय भवानी चौकातील किरण रमेश लाटणे यांच्या राहत्या घराचा लोखंडी सुरक्षा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोकड असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेहल्याची घटना घडली असून यामुळे नागरिक चोरट्यांच्या दहशतीखाली असून गुन्ह्याचा तातडीने तपास लावावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान अज्ञात चोरटा
सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून त्याच अनुषंगाने गुन्ह्याची उकल करावी अशी मागणी
होत आहे.शहरातील मध्यवस्तीत जय भवानी चौकात किरण रमेश लाटणे हे आपल्या कुटुंबीया समवेत राहत असून काल मध्यरात्री दोन ते सहा च्या सुमारास अज्ञात
चोरट्याने घराचा लोखंडी दरवाजा उघडून घरातील सामानाची व कपाटाची उचकापाचक करून
कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.याबाबत लाटणे यांच्या फिर्यादी
नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक
संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
0 Comments