पाथर्डी तालुक्यात आढळला मृत बिबट्या !


करंजी - पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह दगडवाडी, वैजुबाभुळगाव, पवळवाडीसह अनेक गावात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगुनही वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष केले, शेवटी आज डोंगरवाडी, गितेवाडी शिवारात संशयास्पद रित्या मृत अवस्थेत बिबट्या आढळुन आला.

पाथर्डीतालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराच्या कुशीत असलेल्या करंजीसह दगडवाडी, वैजुबाभुळगाव, पवळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडीच्या शिवारात बिबट्याने धुमाकुळ घालुन शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या व जनावरे खाल्ल्याच्या वारंवार तक्रारी करुनही वनविभागाने याची दखल घेतली नव्हती. आज गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरवाडी व गितेवाडी शिवारातील एका शेतात संशयास्पद रित्या मृतावस्थेत असलेला बिबट्या आढळुन आल्याने करंजीसह परिसरातील अनेक गावातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यातच या या भागातील अनेक गावातील वाड्या-वस्त्यावर सिंगल फेज विजेची सुविधा अद्यापही उपलब्ध नसल्याने अशा जंगली जनावरांचा या भागातील शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. या भागात आणखी बिबटे असुन याची गंभीर दखल वनविभागाने घेवुन या भागात पिंजरे लावुन यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वासुदेव पोटे, वैभव गिते, मच्छिंद्र गिते, आदिनाथ डमाळे, अंकुश सानप, देवराम पोटे, गोरख डमाळे, अशोक पोटे, काझी भगवान पोटे, देवराम गिते, रमेश गितेसह अनेक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी केली आहे. बिबट्याच्या संशयास्पद मृत्यू बाबत परिसरातील नागरिकात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

या भागात मोठ्या संख्येने बिबटे आहेत. या भागातील शेतकऱ्यांवर तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले केले त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याऐवजी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात असे येथील तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अंबादास डमाळे यांनी सांगितले तर तिसगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सांगितले कि या भागात मृत बिबट्या आढळुन आला, त्याचा पंचनामा करुन अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाय योजना करण्यात येईल.

 

Post a Comment

0 Comments