पाथर्डी - तालुक्यातील सोनोशी येथील साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांच्या 'आगंतुकाची स्वगते' या कवितासंग्रहास पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ.कैलास दौंड
यांचा हा पाचवा कवितासंग्रह चपराक प्रकाशन,पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे.याआधी
त्यास तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार , महाराष्ट्र साहित्य
परिषद पुणे चे सर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्यासाठीचा ग.ल.ठोकळ पारितोषिक,चंद्रपूरचा
शब्दांगण साहित्य पुरस्कार,राष्ट्रीय संत नामदेव साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पद्मश्री नारायण
सुर्वे साहित्य पुरस्कार 'आगंतुकाची स्वगते'
या कवितासंग्रहासाठी डॉ.कैलास दौंड
यांना १ मे २०२३ या आंतरराष्ट्रीय कामगार व महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नेरळ येथे
दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी प्रदान करण्यात येईल.असे नारायण सुर्वे
साहित्य कला अकादमीचे कार्यवाह पुरुषोत्तम सदाफुले पाटील यांनी डॉ.कैलास दौंड
यांना कळवले आहे. डॉ.कैलास दौंड यांचे या आधी उसाच्या कविता, वसाण,भोग सरू दे उन्हाचा,अंधाराचा गाव माझा
हे कवितासंग्रह व अन्य सात पुस्तके प्रसिद्ध आहेत.
0 Comments