अहमदनगर- नगर शहरांमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका युवकाचा एचड ३ एन २ या विषाणूमुळे बाधित झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि मृत तरुण २३ वर्षीय असून एका खाजगी
वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याला कोरोना विषाणू ने सुद्धा बाधित
केलेले होते. त्यानंतर त्याला h3n2
ची लागण झाल्याचे सुद्धा पुढे येत आहे. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या
माहितीनुसार त्याची रक्ताचे नमुने यासह इतर १९ जणांची रक्ताचे नमुने मुंबईतील
अत्याधुनिक वैद्यकीय शाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या तपासणीचा अहवाल
आल्यानंतर ह्या तरुणाचा मृत्यू कोरोनामुळे झाला की h3n2 या
विषाणूमुळे झाला हे स्पष्ट होणारा आहे. मात्र डॉक्टरांना संशय आहे की या तरुणाचा
मृत्यू h3n2 या विषाणूमुळे झाला असावा. एकूणच देशांमध्ये
आत्तापर्यंत एच थ्री एन टू विषाणूमुळे चार जणांचा बळी गेला असून देशभरात अनेक जण
या विषाणूने बाधित झाल्याचे पुढे येत आहे.
केंद्रीय आरोग्य यंत्रणेने सर्व राज्यांना याबाबत काळजी घेण्याचं
आवाहन केलेला असून योग्य त्या उपाययोजना करण्याचं सांगितलं गेलं आहे. नागरिकांनी
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात आलेले आहे. सर्दी खोकला प्रचंड
ताप अंगदुखी अशी लक्षणे आहे. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून
घ्यावी असं सांगण्यात आलेला आहे. मात्र एकूणच नगर मधे एका युवकाचा मृत्यू झाल्याने
आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
0 Comments