महामार्ग पोलिसांचे पैठण व मढीला जाणाऱ्या भक्ताकडुन कौतुक !

करंजी - सध्या श्रीक्षेत्र मढी आणि पैठणला षष्टीनिमित्त पायी दर्शनाला जाणाऱ्या दिंड्यामधुन प्रवास करणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी आहे. आपले कर्तव्य निभावत असताना महामार्ग पोलिस व पोलिस अधिकारी मोठ्या भक्तिभावाने या दिंड्यात सहभागी होवुन त्यांना रस्त्याने सुरक्षित प्रवास करण्याचा संदेश देत आहेत. 

नगर-पाथर्डी महामार्गाचे काम चालु आहे. आणि याच मार्गावर असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथाच्या व षष्टीनिमित्त पैठण येथील नाथांच्या दर्शनासाठी पायी तर काही दिंडीत या रस्त्याने मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत. शेकडो भाविक जिल्ह्यातुन नव्हे तर राज्यभरातुन या मार्गाने जात आहेत करंजी घाटाच्या पायथ्याशीच महामार्ग पोलिसांची चौकी आहे. या पायी जाणाऱ्या दिंडीतील नाथ भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणुन महामार्ग पोलिस दिंडीत सहभागी होवुन त्यांना अपघाताच्या अनुषंगाने स्वतःची काळजी घेण्याचे तसेच अपघात होवु नये म्हणुन आवश्यक त्या सुचना देत आहेत. सुर्यास्तानंतर प्रवास करु नये, सर्व्हीस रोडचा वापर करावा, रांगेत चालावे यासारख्या महत्वाच्या सुचना देता-देता या दिंडीत सहभागी होवुन हरिनामाचे नाव घेत आहेत. दिंडी प्रमुख यांना सर्व भाविकांची नावाची व मोबाईल नंबरची यादी बरोबर ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. या चौकीतील सर्वच महामार्ग पोलिस कर्तव्य बजावीत असताना हरिनामाच्या भक्तीचाही आनंद घेत आहेत. 

जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील दिंड्याचे व भाविकांचे प्रमाण जास्त असले तरी नाशिक, पुणे तसेच इतर ठिकाणाहुन येणाऱ्या दिंड्याचे तसेच भाविकांचे पायी जाण्याचे प्रमाण जास्त असल्याने महामार्ग पोलिसांच्या कामात-काम आणि हरिनामही या भुमिकेचे दिंडीची भाविक कौतुक करीत आहेत. यावेळी महामार्ग पोलिस उपनिरीक्षक हमीद शेख यांनी सांगितले कि मढी येथील कानिफनाथाच्या तसेच पैठण येथील नाथांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या दिंड्या तसेच भक्ताची मोठी संख्या लक्षात घेऊन या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणुन भक्तांना आमचे पोलिस योग्य मार्गदर्शन करीत आहेत.

Post a Comment

0 Comments