पाथर्डी – तालुक्यातील टाकळीमानूर येथील जयभवानी माता माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेला कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून दगडफेक तसेच परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत या गैरप्रकारा विरुद्ध ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली मात्र बुधवारी दिनांक १५ मार्च दुपारी १२.३० ला झालेल्या हल्ल्या प्रकरणी २४ तासांचा अवधी उलटला असला तरी देखील पोलिसात फिर्याद दाखल न झाल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून पाथर्डी कॉपी गैरप्रकाराची व झोपलेल्या प्रशासनाच्या गलथान कारभाराची चर्चा राज्यभर रंगली जात आहे.
टाकळीमानूर येथील
परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या जमावाने भरारी पथकावर हल्ला करून पथकातील
पंचायत समिती अभियंता रामेश्वर शिवणकर यांना जखमी केल्या प्रकरणी २४ तासांचा अवधी
उलटूनही गांभीर्याने पोलीसात फिर्याद दाखल झाली नाही.दगडफेक व हल्ला प्रकरणी भरारी
पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी जगदीश पालवे व जखमी रामेश्वर शिवणकर हे १५ मार्च
रोजी दुपारी २.१० वाजता उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेवून दुपारी ३ वाजता पाथर्डी
पोलिसात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले होते मात्र सायंकाळी ६ वाजे पर्यंत गटविकास
अधिकारी व जखमी शिवणकर यांना फिर्याद तयार करून पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात
आले,मात्र फिर्याद दाखल करण्यात आली नाही.जखमी ने सांगितलेली फिर्याद पोलिसांनी
वारंवार दुरुस्त करण्याचा आग्रह धरला गेला.
टाकळीमानूर येथील जमावाला जखमीने सांगीतलेल्या कच्च्या फिर्यादी मधील आरोपींचे नावे बाहेर समजल्याने पोलीस ठाण्यात मोठा जमाव झाला व काहींनी फिर्याद दाखल न करण्यासाठी गटविकास अधिकारी जगदीश पालवे व शिवणकर यांची पोलिसांच्या समोरच मनधरणी करण्यास सुरवात केली, जमावातील काहींनी सदर हल्ला प्रकरणी फिर्याद दाखल केल्यास भरारी पथकातील कर्मचाऱ्या विरुद्ध खोटी विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याचा धाक दाखवला,याबाबत गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना फोनवरून कल्पना दिली त्यामुळे वरिष्ठ स्थरावरून जखमीला पाठबळ मिळाले मात्र पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास उशीर लावल्याने व जमावाच्या ससेमिऱ्याला वैतागून गटविकास अधिकारी व जखमी त्याठीकांहून निघून गेले,सायंकाळी जखमी शिवणकर हे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना घडले प्रकारा बाबत काहीच तक्रारी नसल्या बाबत जबाबा देण्याच्या आग्रहा वरून पोलीस व तक्रारदार यांच्यात शब्दिक बाचाबाची झाली त्यामुळे जखमी शिवणकर तेव्हा पासून नॉट रिचेबल झाले आहेत.
दिनांक १५ मार्च
रोजीचे दुपारी ३ ते ६ वाजे पर्यंतचा सर्व प्रकार पाथर्डी पोलीस ठाण्याच्या सी.सी.टी.व्ही
यंत्रणेत मुद्रित झाला असून परीक्षा केंद्रावरील हल्लेखोर बचावासाठी फिर्याद दाखल
करून न घेण्यासाठी पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला आहे का ? आरोपी आणि पोलिसांचे
हितसंबंध आहेत का ? याबाबत वरिष्ठ
पातळीवरून यांची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची तालुक्यात चर्चा आहे. २४
तासांचा कालावधी उलटूनही काहीच कार्यवाही न झाल्याने यापुढील कालावधीत भरारी
पथकातील कर्मचारी व अधिकारी यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे त्यामुळे दिनांक
१६ मार्च रोजी गट विकास अधिकारी जगदीश पालवे यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे
यांना पत्र पाठवून घडले प्रकारा बाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फिर्यादील आरोपींची
नावे बाहेर फुटली कशी हा प्रश्न या निमित्ताने उपस्तित होत आहे. विनयभंगाची खोटी
फिर्याद दाखल करण्याच्या भीतीने जखमी अभियंता शिवणकर कालपासून नॉट रिचेबल असले तरी
या संपूर्ण गैरप्रकारची विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी दखल घेत
कारवाई करण्याची मागणी केली परंतु अध्यापि काहीच कार्यवाही झाली नसल्याने पाथर्डी
पोलिसांना याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे अधोरेखित होत आहे. याबाबत अहमदनगर पोलीस
अधीक्षक राकेश ओला यांनी तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेणे
अत्यावश्यक झाले आहे.
0 Comments