श्री विवेकानंद विद्यामंदिरचे 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

पाथर्डी -भारत सरकारच्या केंद्रशासनाच्या वतीने आयोजित आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धा परीक्षेत पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या शाळेचे दहा विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. विद्यालयातील काळे सुमित अशोक याने तालुक्यात प्रथम स्थान पटकाविले.

         विद्यार्थ्यांना शालेय वयात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने केंद्रशासनाच्या वतीने इयत्ता आठवी या वर्गासाठी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड होऊन घवघवीत यश संपादन केले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते उच्च शिक्षणपर्यंत प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे: काळे सुमित अशोक, डोळे वैभव सोमनाथ, येळाई सोहम सुहास,कुसळकर श्लोक सुरेश,फुंदे ईश्वर आदिनाथ, देवढे आर्यन प्रसाद, सानप अभिमन्यू महेश, शेळके अमृता देविदास, गर्कळ पूजा राजेंद्र, डीगे व्यंकटेश दत्तात्रय या सर्व विद्यार्थ्यांना पाच वर्षासाठी साठ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

     यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड, मुख्याध्यापक शरद मेढे , संपत घारे, ज्ञानेश्वर गायके व सर्व शिक्षक शिक्षकेतर व पालक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर गायके, विठ्ठल धस, स्नेहल बोराडे,अर्चना दराडे, सतीश डोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments