आगंतुकाची स्वगते कवितासंग्रहास नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार

 

पाथर्डी - नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित नेरळ जिल्हा रायगड येथील काव्य जागर साहित्य संमेलनात १ मे रोजी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. ‌कैलास दौंड यांच्या 'आगंतुकाची स्वगते' या चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहास नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

या पुरस्काराचे वितरण भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले तर प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.जगदीश कदम यांना साहित्यिक कार्याबद्दल नारायण सुर्वे जीवन गौरव साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.रोख रक्कम, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. या काव्यजागर साहित्य संमेलनात पुरस्कार वितरणा नंतर कविता सादरीकरण झाले. या कार्यक्रमास श्रीपाल सबनीस,अरुण म्हात्रे, पुरुषोत्तम सदाफुले,संभाजी मलघे,प्रदीप पाटील, जगदीश कदम, विशाखा दौंड,सुदाम भोरे, अभिजित पाटील,नागनाथ पाटील,मनिषा पाटील,खेमराज भोयर,प्रवीण पवार, अस्मिता चांदणे, श्रीनिवास म्हस्के,वसंत पाटील,भरत बारी,भरत दौंडकर,प्रभाकर वाघोले, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कन्या,जामात यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments