पाथर्डी - सामाजिक सेवेची
बांधीलकी जपणारी पत्रकारीता सामाजिक प्रश्न चव्हाट्यावर आणुन त्यांची सोडवणुक करते लोकप्रतिनिधी, लोकसेवक यांच्या
चांगल्या कामाला मदत व चुकीच्या धोरणांवर कडक टिका करण्याची भुमिका पत्रकार घेत
असतात.आम्ही कुठे चुकतो हे दाखवुन देण्याचे काम
प्रसारमाध्यमे करीत असतात.पत्रकारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहु असे
प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
मराठी पत्रकार परीषदेच्या पाथर्डी
तालुकाध्यक्षपदी राजेंद्र सावंत यांची निवड झाल्याबद्दल येथील
अतिथी मंगल कार्यालयात पाथर्डी पत्रकार
संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयशंकर महाराज मठाचे महंत प.पु.
माधवबाबा होते. गुरुवर्य येळेश्वर संस्थानचे मंहत
रामगिरी महाराज,केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रतापराव
ढाकणे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल साठे, गटविकासअधिकारी डॉ.जगदिश पालवे, अभय आव्हाड, अशोकभाऊ गर्जे, बाजार समितीचे
सभापती सुभाष बर्डे, गोकुळभाऊ दौंड, डॉ.मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, डॉ.बंडु भांडकर,संभाजी पालवे, अमोल गर्जे, भिमराव फुंदे,बंडुपाटील बोरुडे, महेश बोरुडे, भगवान दराडे, नासीरबाई शेख, अविनाश पालवे, शिवशंकर राजळे, काशीताई गोल्हार, भारती असलकर, अनुराधा फुंदे,प्रसाद आव्हाड, संजय बडे, भगवान गर्जे, कैलास देवढे, अनिल बोरुडे, डॉ.सुहास उरणकर, योगेश रासणे, राजु मेरड, अनंता ढोले, दिलीप नागरगोजे,एकनाथ आंधळे, मंगल कोकाटे, विजया पातकळ, रंजना सावंत, वंदना बडगे, भारती
असलकर, पोपट फुंदे यांच्यासह विविध संस्था सामाजिक
संस्थेचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्य़कर्ते
उपस्थीत होते.
यावेळी बोलताना अँड.प्रतापराव ढाकणे
म्हणाले, पत्रकारांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी राजेंद्र सावंत यांची
निवड झाली आहे. त्यांच्या हातुन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची
सोडवणुक व्हावी. पत्रकारीते समोरील आवहाने मोठी आहेत. प्रिंट मिडीयावर
लोकांचा प्रचंड विश्वास आहे. ते जपण्याचे काम पाथर्डीच्या पत्रकारांनी
केलेले आहे.सामाजिक कार्यात नेहमीच्या आमच्या सोबत ही मंडळी असतात.
प्रतिकुल परस्थीतीवर मात करुन ह्या क्षेत्रात काम करणे जिकरीचे आहे. सर्व
पत्रकारांचे काम समाजाला दिशा देणारे आहे. संघटनेत सर्वांना सोबत घेवुन
काम करावे. तुमच्या सर्व कार्यात आम्ही सहभागी असतो. सामाजिक कामात तुमचेही
योगदान मोठे असते. यावेळी राजेंद्र सावंत यांचा सपत्नीक सत्कार
करण्यात आला. संदीप शेवाळे, उमेश कुलकर्णी, नारायण पालवे, बाबासाहेब गर्जे, राजेंद्र देवढे, अमोल कांकरीया ,उमेश मोरगावकर, अनिल खाटेर, अभीजीत खंडागळे, चंद्रकांत गायकवाड, विलास मुखेकर, शिवदास मरकड, सतिष जगताप,सोमनाथ बोरुडे,अजय गांधी, दादासाहेब येढे,सचिन दायमा, कपील भोसले उपस्थीत
होते. प्रस्ताविक अविनाश मंत्री यांनी केले. प्रा. शेखर ससाणे यांनी
सुत्रसंचालन केले. अँड. हरीहर गर्जे यांनी आभार मानले.
0 Comments