करंजी - १ जुन हा दिवस सरकारी वाढदिवस म्हणुन साजरा केला जातो. अनेकांचे वाढदिवस याच दिवशी असतात, गावातील एकोपा,जातीय सलोखा कायम रहावा म्हणुन गावकऱ्यांनी या सगळ्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करुन वेगळा आदर्श इतर गावासमोर ठेवला.
पुर्वीच्या काळात जन्मलेल्या बाळाच्या जन्मतारखा आई-वडिलांच्या ध्यानात रहात नसत, मग त्या मुलाला शाळेत घातल्यावर शिक्षक त्याची जन्मतारीख १ जुन करीत असत. म्हणुन अनेकांचा वाढदिवस या दिवशी असतो. करंजी गावातही या दिवशी अनेकांचा वाढदिवस असतो. गावातील या सगळ्यांचा वाढदिवस एकत्रीत साजरा करायचा ठरविले, त्यासाठी करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, सोसायटीचे संचालक सुभाष अकोलकर, सुनिल साखरे यांनी पुढाकार घेतला. गावातील कोणत्याही जातीचा, पक्षाचा असो त्याचा वाढदिवस एकत्रीत साजरा करण्याचे ठरले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, आदर्श शिक्षक विजय अकोलकर, शरद अकोलकर, जबाजी अकोलकर, सोसायटीचे चेअरमन आसाराम अकोलकरसह गावातील १३ जणांचा एकत्रीत केक कापुन उत्तरेश्वराच्या मंदिरात वाढदिवस साजरा करण्यात आला. गावातील जातीय सलोखा, एकोपा याचे दर्शनच या वाढदिवसात दिसुन आले. या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमास सरपंच बाळासाहेब अकोलकर,रफिक शेख, सुभाष ब. अकोलकर, अभय गुगळे, सुनिलशेठ साखरे, उपसरपंच नवनाथ आरोळे, ग्रा. पं. सदस्य रोहित अकोलकर, बाबा गाडेकर, सोसा.चे सचिव सुभाष अकोलकर, सोसायटीचे माजी चेअरमन रमेश अकोलकर, बंडु अकोलकर, सुनिल मुरडेसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते. १ जुन रोजी अनेकांचा वाढदिवस असतो, याचे निमित्त साधुन गावातील एकोपा, जातीय सलोखा, तसेच एकमेकाविषयी आदराची भावना वाढीस लागावी, याचा आदर्श इतर गावात घेतला जावा या भावनेतुन हा कार्यक्रम घडवुन आणला असे करंजी गावचे सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी सांगितले.
0 Comments