पाथर्डी- मिरी -तिसगाव पाणी पुरवठा योजनेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला अनाधिकृतपणे कनेक्शन घेवुन पिण्याचे पाणी चोरुन ते शेतीसाठी वापरत असल्या प्रकरणी अनिल राजाराम वाघ, रा. जवखेडे खालसा यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याची चोरी करणा-या विरु्दध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी दिला आहे. जवखेडे खालसा शिवारात दुध डेअरी जवळ अनिल राजाराम वाघ याने मिरी-तिसगाव पाणी पुरवठा योजनेच्या पाईलाईनला अनाधिकृतपणे कनेक्शन घेवुन पाणी चोरी केली आहे. पिण्याचे पाणी शेतीसाठी वापरल्याने लोकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनिल वाघ याच्या विरुद्ध शासकीय पाणी चोरीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.वाघ हा शेतकरी किती दिवसापासुन पाणी चोरीत होता याचा तपास पोलिस करीत आहेत. पिण्याच्या पाण्याची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. केवळ गुन्हे दाखल करुन काहीजण एकत नाहीत. पाणी ही जिवनावश्यक असल्याने त्यासाठी अजुन कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. केवळ एका व्यक्तीच्या चोरीमुळे अनेक लोकांना पिण्याचे पाणई मिळत नाही.याबाबत ठोस कारवाई झाली पाहीजे.
याबाबत पाथर्डी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांनी सांगितले कि मिरी-तिसगाव पाणी योजनेसाठी असलेल्या पाईपलाईनला अनेक शेतक-यांनी अनाधिकृत कनेक्श घेवुनपाणी चोरी केलेली आहे.काही जणाविरु्द्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापुढील काळात पाणी चोराविरु्दध प्रशसान कडक भुमिका घेईल. पाणई चोरावर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल.
0 Comments