आंबेवाडी ग्रामस्थांचा पाण्यासाठी महामार्ग रोको आंदोलन !

 

पाथर्डी – देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी परिसर मुलभूत सुविधांपासून दुर्लक्षित असून आंबेवाडी ग्रामस्थांनी पिण्याचे पाण्या करिता तसेच गावातील अंतर्गत रस्ते व हातपंप इत्यादी सुविधा मिळण्या करिता पाथर्डी अहमदनगर महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.

आंदोलनाचे नेतृत्व मयूर चव्हाण यांनी करत आंबेवाडी येथे पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना वणवण करावी लागत असून गावात रस्ते नाहीत त्यांमुळे प्रशासनाने लक्ष घालून पिण्याच्या पाण्यासाठी टंकर सुरु करावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पना प्रवीण चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य योगेश सुभाष राठोड,अनिल विठ्ठल चव्हाण,राजेंद्र दीपा चव्हाण,संजय दीपा चव्हाण,सुनील परसराम चव्हाण,मच्छिंद्र रामदास चव्हाण,भाऊसिंग राठोड,परसराम राठोड,शांताराम चव्हाण,मानसिंग राठोड,दत्तात्रय राठोड,लिलाबाई चव्हाण,सविता चव्हाण,संगीता राठोड,कविता जाधव,सुंदराबाई चव्हाण,गीता राठोड,अनिता चव्हाण व इतर शेकडो आंदोलक ग्रामस्थ हजर होते. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी विसरवाडे यांना निवेदन देण्यात आले असून वरिष्ठा सोबत बोलून आंबेवाडी ग्रामस्थाच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलना दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 


Post a Comment

0 Comments