मोलकरणीनेच चोरले साडेचार तोळे सोन्याचे दागिने !


पाथर्डी – हनुमान टाकळी येथील घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेने घरातील मालकिणीच्या साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला असून पोलिसांनी दागिने चोरीच्या गुन्ह्यात तपास करून तात्काळ आरोपी मोलकरीण लंका शिरसाठ हिचे कडून साडे चार तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

हनुमान टाकळी येथील सुभद्रा नवनाथ बर्डे ह्या त्यांचे पती नवनाथ व मुलगा गणेश यांच्यासह गावात रहात असून त्यांनी शेती व घरकामासाठी गेल्या तीन महिन्या पासून घरकाम व शेती कामाला गावातील लंका संतोष शिरसाठ हिला कामाला ठेवले होते.दिनांक ५ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता फिर्यादी सुभद्रा बर्डे यांनी त्यांचे वापरातील सोन्याचे गंठन चार तोळे तसेच सोन्याची अंगठी अर्धा तोळा त्याची अंदाजे किमंत २,७०,०००/-असा ऐवज काढून बेडरूम मधील कपाटात ठेवले होते दुसऱ्या दिवशी फिर्यादी सुभद्रा यांनी तिसगाव येथे जाण्यासाठी कपाटातील दागिने अंगावर घालण्या साठी कपाट उघडले असता तेथे ठेवलेले दागिने आढळून आले नाही त्यांनी आरोपी मोलकरीण लंका संतोष शिरसाठ हिचे कडे चौकशी केली असता तीने दागिन्या बाबत उडवा उडवीचे उत्तरे दिले त्यामुळे फिर्यादीने तात्काळ पाथर्डी पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. दाखल फिर्यादीच्या अनुषंगाने पो.नि संतोष मुटकुळे व सपोनि रामेश्वर कायंदे यांच्या मार्गदर्शना खाली पो.ना.अनिल बडे,पो.शि.अमोल कर्डीले,पो.शि एकनाथ बुधवंत,पो.शि.राजेंद्र बडे,.पो.शि.मनिषा धाने,.पो.शि.मनिषा वारे यांनी आरोपी लंका शिरसाठ हिला चौकशी साठी ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखवताच तीने चोरी केलेले दागिने काढून दिले आहेत.  


Post a Comment

0 Comments