पिंपरी चिंचवड येथील माजी 'मुख्याध्यापक स्व.माणिकराव गर्जे प्रतिष्ठान कडून प्रसिद्ध साहित्यिक डॉ कैलास दौंड यांना संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक 25 जून 2023 रोजी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर सांगवी, पुणे येथे माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे यांनी कळविले आहे. यावेळी सौ. सुरेखा कटारीया यांना संत बहेनाबाई पुरस्कार, डॉ कैलास दौंड यांना संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार,श्री.ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार,अनुराधाताई घुले यांना माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि नितीन भिलारे यांना युवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात प्रा.संपत गर्जे यांची अभंगाची मूल्यगंगा आणि सारांश लेखन एक कला ही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. या कार्यक्रमास शिवानंद स्वामी महाराज',बालभारतीचे संचालक श्री कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षक संचालक संपत सुर्यवंशी, भारतीय जैन संघटनेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष विलासजी राठोड आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
0 Comments