आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव शिवारात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या हकीम भोसले (रा.पुंडी वाहिरा) याला ग्रामस्थांनी मारहाण केली होती. मारहाणीत उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस अंमलदार बंडू दुधाळ यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलिसांत खूनाचा दि. २२ जुलै २०२० रोजी पोलीस ठाण्यात २१५/२०२० रोजी कलम ३०२, १४७, १४८,१४९ यानूसार २२ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी राहुल गायकवाड हा मागील तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी आल्याची खबर मिळाल्यावरुन त्यास सापळा लावून रविवारी गजाआड करण्यात आले. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, गुन्हे शाखेचे संतोष साबळे, सपोनि गणेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हनुमान खेडकर, विकास राठोड, प्रसाद कदम, स्वाती मुंडे यांनी कारवाई केली आहे.
0 Comments