कडा / वार्ताहर- खरीप हंगाम २००२३- २४ मध्ये शासनाच्या पीकविमा योजनेत अधिकाधिक शेतक-यांनी सहभाग नोंदवावा. याकरिता कडा बाजार समितीने पीकविमा भरण्यासाठी लागणारा एक रुपया बाजार समिती भरणार आहे. त्यामुळे या विनामुल्य पीकविमा योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.
शेतक-यांच्या पिकांना नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळावे. याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली असून, या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत आहे. या महत्वपुर्ण योजनेचा अधिकाधिक शेतक-यांना लाभ घेता यावा. म्हणून आ. सुरेश धस यांच्या सुचनेनुसार कडा कृषी उत्पन्र बाजार समितीने त्युत्य उपक्रम राबवला आहे, सदर पीकविमा काढण्यासाठी शेतक-यांना लागणारा एक रुपया बाजार समिती स्वत: भरणार आहे. त्यामुळे या विनामुल्य पीकविमा योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. तसेच हा विनामुल्य पीकविमा काढण्यासाठी कडा येथील गुरुदत्त शेतकरी सुविधा केंद्र मार्केट यार्ड, दत्तकृपा झेराॅक्स, डाॅ. आंबेडकर चौक आष्टी याठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह शेतक-यांनी त्वरीत संपर्क साधावा. असे आवाहन सभापती तांबोळी यांनी केले आहे.
0 Comments