विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक ! पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा !

पाथर्डी शाळकरी अल्पवयीन मुलीला घरात बंधक बनवून तिच्याशी लग्न करण्याच्या मागणीसाठी तिचा विनयभंग केल्याच्या निषेधार्थ तसेच सदर घटनेतील सर्व आरोपीं विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

पाथर्डी शहरातील कसबा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली.बाजार पेठेत मोर्चा आल्या नंतर उस्फुर्त पणे हजारो युवक,जेष्ठ तसेच महिला या मोर्चात सहभागी झाल्याने मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले होते.

पोलीस ठाण्यात मोर्चा आल्या नंतर मोर्चेकर्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.यावेळी भारती असलकर,अमोल गर्जे, मुंकुद गर्जे,अर्जुन धायतडक,संतोष जिरेसाळ, भगवान दराडे, रामनाथ बंग, प्रतिक खेडकर,नाना पालवे,सचिन नागापुरे, डॉ.रामदास बर्डे,अतिश निऱ्हाळी यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली.

यावेळी बोलताना सचिन नागापुरे म्हणाले कि, प्रत्येक गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्यास गुन्हेगारा प्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे अन्यथा अल्पवयीन म्हणून कोणीही गुन्हे करील,त्यासाठी कायद्यात बदल आवश्यक आहे. हीन प्रवृत्तीच्या गुन्हेगार असलेल्या आरोपींच्या व्यवसायावर सार्वजनिक बहिष्कार टाकला जावा जेणे करून आर्थिक कोंडी होवून असे आरोपी यापुढे गुन्हे करणार नाहीत. यावेळी भारती असलकर म्हणाल्या कि,पाथर्डी शहरात दामिनी पथक कार्यन्वित नाही ते पोलिसांनी तत्काळ कार्यान्वित करावे अन्यथा आम्हालाच दुर्गा शक्ती पथक कार्यन्वित करावे लागेल. रामनाथ बंग म्हणाले कि शहरातील शाळा कॉलेज परिसरात दैनदिन मुलींची छेडछाड केली जाते त्यासाठी पोलीस गस्त आवश्यक आहे यावेळी शेवगाव येथून मोर्चासाठी आलेले बंटी म्हस्के यांनी सांगितले कि यापुढील कालवधीत अश्या घटनांच्या बाबतीत आरोपीला कायद्याचा धाक राहिला नाही त्यामुळे त्यांना जनताच धडा शिकवेल व जश्यास तसे उत्तर दिले जाईल.

यावेळी अमोल गर्जे यांनी सांगितले कि आरोपींचे मनोधर्य वाढले असून त्यांना धडा शिकवन्यासाठी यापुढे मोर्चा आरोपीच्या घरा समोर नेहला जाईल, आरोपी कडे तलवार चाकू असे शस्त्र कोठून आले ते जप्त झाले नाही तर आम्ही सार्वजनिक रित्या तलवार वाटप कार्यक्रम राबवू. यावेळी प्रतिक खेडकर म्हणाले कि, शाळकरी मुलींचा खुलेआम विनयभंग होत असेल आणि काहीच कार्यवाही होत नसेल तर आम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेवू,प्रशासनाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्फत कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.यावेळी सुभाष पवार यांनी सांगितले कि आम्ही हिंदू बांधव भगिनींच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असून सदर गुन्ह्यातील आरोपीच्या आई वडिलांना सह आरोपी केले पाहिजे.

मनसेचे संतोष जिरेसाल हे म्हणाले कि, हा मोर्चा कोणत्याही समाजा विरुद्ध नाही तर गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध आहे, प्रत्येक भगिनीने आपली परंपरा,संस्कृती जपली पाहिजे तसेच शस्त्र आणि शाश्त्राचा अभ्यास केला पाहिजे.यावेळी डॉ बर्डे यांनी सांगितले कि,चोऱ्या व विनयभंग अश्या गुन्ह्यात विना क्रमांकाच्या दुचाकीचा वापर होत आहे त्याबाबत पोलिसांनी कडक धोरण राबवले पाहिजे. भगवान दराडे म्हणाले कि, असे गुन्हे करणारे आरोपी यांचे शहरात खुलेआम दारू,गांजा,बिंगो अशी अवैध धंदे असून त्यावर पोलिसांनी कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.यावेळी पाथर्डी तालुक्यात लव्ह जिहाद सारखे प्रकार घडायला लागले असून त्यापाठीमागे कोणीतरी शक्ती कार्यरत असल्याचा संशय सर्वच मोर्चेकर्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच उपनिरीक्षक सचीन लिमकर यांनी सांगितले कि, गुन्ह्यातील अनोळखी महीलेचा शोध सुरु आहे. अल्पवयीन आरोपीच्या मोबाईल डिटेल्स वरुन आणखी कोण यामधे सभागी आहे का याचा पास घेतला जात असून आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नगर येथे बालकांचे न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर कडक कार्यवाही करू असे आश्वासन दिल्याने मोर्चा विसर्जीत करण्यात आला. 

यावेळी रामदास कांबळे, गणेश बाहेती, अमोल सोळसे, कृष्णा रेपाळ, सुनिता उदबत्ते,उज्वला सरोदे,ज्योती काबंळे,अनिता काळंगे,दिपाली चिनके, सारीका भैरट, द्तात भेरट, दत्ता
घिगे, मंगल कुरकुटे, शैलेश उगार, सोमनाथ बंग तसेच शेवगाव,पाथर्डी, नेवासा येथील हिंदु रक्षा युवा समितीचे
सदस्य, नागरीक व महीला उपस्थीत होत्या.  


Post a Comment

0 Comments