कड्यात भंगारचा ट्रक विधुत तारेला चिकटला करंटच्या भीतीने ट्रकमधून उडी मारल्याने चालकाचा मृत्यू


कडा / वार्ताहर -आष्टीकडून नगरकडे भंगार घेऊन जाणा-या ट्रकला विद्युत वाहिनीचा करंट लागल्यामुळे अचानक भयभीत झालेल्या ट्रक चालकाने जीव वाचवण्यासाठी कॅबिनमधून बाहेर उडी मारली. परंतू चालक रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास कडा येथील डाॅ. आंबेडकर चौकात घडली. या अपघातात भागवत गेणा धांडे (वय- ३८) रा.कर्जत असे मृत चालकाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातून जात असलेल्या बीड- नगर राष्ट्रीय महामार्गावरील अहमदनगरकडून भंगाराचे साहित्य घेऊन जात असलेला (MH. १२,EQ १४७९ ) असा क्रमांक असलेला ट्रक हा कडा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विद्युत तारेचा चिकटल्याने सदर वाहनात विद्युत प्रवाह उतरला. मात्र याप्रसंगी भयभीत झालेल्या ट्रक चालकाने जीव वाचवण्यासाठी ट्रकच्या केबीनमधुन खाली उडी घेतली. मात्र याप्रसंगी रस्त्यावर पडल्याने चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या दोनच्या सुमारास घडली. ट्रकचालक भागवत धांडे असे मृत चालकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments