राजेंद्र जैन / कडा - या देशातील राष्ट्रीय समाज हा जागा व्हावा, स्वतःच्या पायावर उभा राहावा, सामाजिक, राजकीय, आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती व्हावी. हाच जनस्वराज यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश असून, आगामी काळात माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार, खासदार किती असतील हे प्रस्थापित भाजपा, काँग्रेसला दाखवून देणार आहे. सत्तेसाठी मला कुणाकडे भीक मागायची गरज नाही. "आय एम नॉट डिमाइंडर, आय एम ए कमांडर" असे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी काढलेल्या जनस्वराज यात्रेचे कड्यात आगमन झाले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शिवाजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत जाणकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कड्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जाणकर यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी याप्रसंगी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की या देशात प्रस्थापित राजकीय पक्षांची दादागिरी वाढली असून, या पक्षांना असं वाटतंय की तुम्ही कितीही आमदार, खासदार निवडून द्या. आम्ही त्यांना विकत घेऊ, हीच भूमिका धनदांडग्या पक्षांची झाली. त्यामुळे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी विकले जाऊ नयेत, म्हणून जनतेनेच जागृत होऊन लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याची गरज आहे. या देशातील राष्ट्रीय समाज जागा व्हावा, त्या समाजाची सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगती व्हावी. डाॅ. आंबेडकरांनी दिलेला घटनात्मक अधिकार ज्या-त्या समाजाला मिळाला पाहिजे. हाच जनस्वराज यात्रा काढण्या मागचे उद्दिष्ट आहे. या देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला. मात्र गरीब हटला, पण गरिबी हटली नाही. त्यानंतर जनतेला वाटलं भाजपा न्याय पण तेही काँग्रेसपेक्षा चार हात पुढे जाऊन फेकाफेकी करणारे निघाले. नुसती मोठ मोठी भाषणे ठोकून जनतेचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. सध्या देशात महागाई, बेरोजगारी वाढली, शेतकरी, व्यापारी त्रस्त आहेत. पंजाब, तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना सर्व सबसिडी मिळतात, दलितांना सर्वतोपरी हक्क मिळतात. तिथे सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली जाते. पाणी, आरोग्य, वीज यासारख्या चांगल्या सुविधा मिळत असतील तर महाराष्ट्रात का नाहीत. राज्यात धरणे, तलाव,, नद्या असताना सुद्धा सुबत्ता का नाही. असा सवाल जाणकर यांनी उपस्थित केला. मात्र सध्या देशभरात विकासाला प्राधान्य न देता जातीय, धार्मिक तेढ निर्माण केले जात आहेत. हे सामाजिक ऐक्यासाठी घातक असून, या देशात सामाजिक सलोखा कायम टिकून राहिला पाहिजे. हीच रासपाची भूमिका आहे. राज्यात नव्हे तर देशात 543 मतदारसंघात जनस्वराज यात्रा जनतेची संवाद साधणार असून 40 पेक्षा जास्त खासदार राज्यात निवडून आणणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.
सत्तेसाठी मला कुणापुढे भीक मागायची गरज नाही !
या राज्यात माझा फोटो लावून चार आमदारांसह दोनशेहून अधिक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक निवडून आणले आहेत. यापुढेही असाच माझा फोटो लावून राज्यात 40 खासदार निवडून आणेल. त्यावेळेस भाजपा, काँग्रेस सारखे प्रस्थापित पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या दारात येतील. मला कुणाच्या दारात भीक मागायला जाण्याची गरज नाही. "आय एम नॉट डिमाइंडर, आय एम ए कमांडर" असल्याचे महादेव जाणकर म्हणाले.
--------------
0 Comments