कडा / वार्ताहर - सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले बीड येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान नाकेल यांची अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची राष्ट्रीय अध्यक्ष दिलिप घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे कार्यकारिणीची नुकतीच विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत मागील वीस वर्षापासून जैन समाजाच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते वर्धमान नाकेल यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांची सलग दुस-यांदा जिल्हाध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड केली आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष दिलिप घेवारे, महामंत्री नितीन नखाते, सचिव महावीर घोडके, राष्ट्रीय प्रवक्ते पवन अंबुरे, उपाध्यक्ष राजेश फडकुले, राजीव बुबणे, पत्रकार अनिल म्हेत्रे, राजेंद्र जैन, प्रमोद डेरे, शालिनीताई पलसापुरे, संतोष औटी, श्रीपाळ धुमाळ, सागर ढोले, सुभाष धुमाळ, विजय औटी, अमोल ढोले, महेंद्र पेटकर, सुरेश कस्तुरे आदींनी वर्धमान नाकेल यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments