कडा - संभाजीनगर येथून आलेले पोलिस
निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी आष्टी पोलिस ठाण्याचा पदभार घेतला असून त्यामुळे
ब-याच वर्षानी का होईना आष्टीला शिस्तप्रिय पोलिस अधिकारी मिळाला असल्याची भावना
सर्वसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
आष्टी पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस
निरीक्षक संतोष खेतमाळस हे खाकी वर्दीतले एक शिस्तप्रिय पोलिस अधिकारी म्हणून
प्रशासनात परिचित आहेत. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यासह
स्थानिक गुन्हे शाखेत देखील उत्कृष्ट कामगिरी बजावून पोलिस प्रशासनात आपल्या
कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. आष्टी पोलिस ठाण्याचा पदभार घेताच, पोनि खेतमाळस यांनी वाढत्या चो-या, तंटामुक्त गाव,
शालेय, महाविद्यालयीन मुलींची छेडछाड,ट्रीपलसीट टगेगिरी, बेशिस्त वाहतूक, शेतक-यांचे बांधाचे प्रश्न यासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रीत केले असून,
नागरिकांनी आपले प्रश्न निःसंकोचपणे सांगावेत. पोलिस
सर्वसामान्यांच्या पाठीशी असून, त्यांचे प्रश्न न्याय-
हक्काच्या दृष्टीने सोडविणार असल्याचे खेतमाळस यांनी सांगितले.
0 Comments