अ‍ॅड.सचिन जगन्नाथ बडे यांची शासकीय अभियोक्ता पदी निवड


पाथर्डी - तालुक्याचे सुपुत्र अ‍ॅड.सचिन जगन्नाथ बडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहाय्यक शासकीय अभियोक्ता वर्ग १ या राजपत्रित पदासाठी निवड झाली आहे, ते श्री तिलोक जैन विद्यालयाचे माजी विद्यार्थी असुन, त्यांनी कायद्याचे शिक्षण पुणे येथील नामांकीत आय.एल.एस विधी महाविद्यालयातून पुर्ण केले व पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे वकिली करत असतानाच अभ्यास करत त्यांनी सदर परीक्षा दिली व यश संपादन केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, त्यांना आव्हाड लॉ क्लासेसचे प्रा.अ‍ॅड.गणेश बाप्पासाहेब शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments