सार्वजनिक बांधकाम विभाग लावणार ३००० झाडे !


पाथर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व संवर्धन मोहिमे अंतर्गत शासकीय विश्राम गृह परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

१५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित सार्वजनिक बांधकाम उपविभाग,पाथर्डी अंतर्गत शासकीय विश्रामगृह, पाथर्डी येथे देशी झाडांचे वृक्षरोपन करण्यात आले. या वेळी उपविभागीय अभियंता वसंत बडे यांच्यासह कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी एक झाड लावा व संगोपन करा असा संकल्प केला असून अभियंता बडे यांच्या संकल्पनेतुन येत्या कालावधीत पाथर्डी तालुक्यातील रस्त्यालगत एकुण ३००० झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याचा अनोखा व स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, यावेळी अड. हरिहर गर्जे,शाखा अभियंता जे.यु.सय्यद,ए.ए. सय्यद,आर. टी. कंगणकर, स्थाप.अभि.सहा.बालाजी ढोले,श्रीकांत पालवे,वरिष्ठ लिपीक ए.बी.दराडे,कनिष्ठ लिपीक एम.डी.शिरसाठ व आर. पी. फुंदे,भारत केकाण,उद्धव कोलते,दत्ता नांगरे,राजेंद्र बनसोडे इत्यादी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments