पाथर्डी - तालुक्यातील सोनोशी गावचे सुपुत्र , प्रसिद्ध साहित्यिक आणि प्राथमिक शिक्षक डॉ कैलास दौंड यांनी लिहीलेली 'तुडवण ' नावाची कादंबरी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या एम.ए.( मराठी) प्रथम वर्ष प्रथम सत्र अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. 'ग्रामीण साहित्य प्रवाह आणि निवडक कलाकृती' या विषयात 'ग्रामीण साहित्याचे स्वरूप समजून घेत, 'बोलावे ते आम्ही'(श्रीकांत देशमुख),'उचल'(श्रीराम गुंदेकर आणि 'तुडवण'(कैलास दौंड) या कलाकृतींचा अभ्यास विद्यार्थी करणार आहेत.
कैलास दौंड हे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाथर्डी तालुक्यातील शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. समकालीन मराठी साहित्यातील महत्त्वाचे साहित्यिक असणाऱ्या डॉ कैलास दौंड यांनी कविता,कादंबरी,कथा , ललित गद्य आणि बालसाहित्य लेखन केलेले असून आजवर त्यांची पंधरा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत.
सन.२०१९ मध्ये मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या 'तुडवण' या कादंबरीत आजच्या ग्रामीण तरूणांची ओढताण मांडलेली असून आजचे ग्रामीण जीवन आणि तिथली मानसिकताही प्रतित झालेली आहे. या आधीही त्यांची 'कापूसकाळ' नावाची कापूस प्रश्नावरील कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट होती. मुंबईतील रामनिरंजन रूईया या स्वायत्त महाविद्यालयाच्या बी.ए.अभ्यासक्रमात 'कापूसकाळ' समाविष्ट असून डॉ.बा.आ.म.विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात स्थुलवाचनासाठी समाविष्ट आहे. तर त्यांचा 'उसाच्या कविता' हा कवितासंग्रह कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथे एम.ए.अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता आठवी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातही त्यांची 'गोधडी' कविता समाविष्ट आहे..
डॉ कैलास दौंड यांचे 'तुडवण' कांदबरी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल सरदार जाधव,बबन मिंडे,नीता माडगूळकर,सुदाम मगर, श्रीराम गव्हाणे, शशिकांत शिंदे, रवींद्र पांढरे, राजेंद्र सलालकर, लक्ष्मण खेडकर, एकनाथ आव्हाड,विवेक उगलमगले, रवींद्र जवादे,आसाराम लोमटे,विठ्ठल जाधव,संगीता अरबुने,अजीम नवाझ राही,लक्ष्मण मलगीरवार, श्रीकृष्ण राऊत,संदेश बांदेकर, सदाशिव सरकटे,मंगेश नारायणराव काळे,डि.के.शेख,नागेश शेलार,शिरीष लांडगे,किरण भावसार,जीवन आनंदगावकर,संजय बालाघाटे, प्रल्हाद वावरे, प्राचार्य जी.पी.ढाकणे,सतेज दणाणे , भास्कर निफाडे,सुरेश सावंत, भूषण रामटेके,देवकर्ण मदन सर,आबा महाजन, श्रीकांत पाटील, दासू वैद्य सर,आनंद विंगकर ,नीळकंठ शेरे, प्रल्हाद वावरे आदी साहित्यिक आणि साहित्याभ्यासकांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments