छायाचित्रकारच आनंदाचे क्षण कैद करू शकतो - प्रा.डाॅ.विधाते



कडा / वार्ताहर - छायाचित्रकार हा समाजातील महत्वाचा घटक असून, कारण त्यांनी कॅमे-यात कैद केलेले फोटो भुतकाळातील आठवणी जिवंत ठेवण्याचे कार्य करतात. त्यामुळे नवोदीत छायाचित्रकारांनी आनंदाचे क्षण टिपण्याचे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. हरिदास विधाते यांनी केले.

कडा येथे जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्राचार्य डाॅ. हरिदास विधाते होते तर प्रमुख पाहूणे म्हणून रासपचे प्रदेश सरचिटणीस डाॅ.शिवाजी शेंडगे, भाजपाचे नेते शंकर देशमुख, जेष्ठ छायाचित्रकार अरुण ढोले, नवनाथ आजबे, बबनराव धस, काशिनाथ कर्डीले, पत्रकार राजेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डाॅ.शिवाजी शेंडगे म्हणाले की, नवोदीत छायाचित्रकारांनी फोटोग्राफी करताना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन समाजात स्वत:ची एक वेगळी इमेज तयार करुन कलेचा आगळावेगळा ठसा उमटविला पाहिजे. याप्रसंगी जेष्ठ छायाचित्रकार अरुण ढोले, शंकर देशमुख, चंद्रशेखर ढोले,  नवनाथ आजबे, बबनराव धस यांनी त्यांच्या फोटोग्राफी करताना त्यांच्या काळात त्यांना आलेले अनुभव सांगून नवोदीत छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त छायाचित्रकारांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सागर ढोले, अंबादास जगताप, अमोल ढोले, विशाल इथापे, अक्षय भवर, विशाल ढोले, अंकुश चव्हाण, अतुल ढोले, प्रशांत पाचपुते, प्रेमराज साळवे, राहुल ढोले, प्रकाश एकसिंगे, किरण शिंदे, अशोक कुमखाले, मयूर गोंदकर, सुधीर गायकवाड, उमेश कवळे आदी छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर ढोले यांनी केले तर आभार ग्रा प सदस्य प्रशांत देशमुख यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments