येथील जागृत श्री कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरु असुन अनेक दानशुर व्यक्तीकडुन या मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामासाठी मदतीचा ओघ चालु आहे. श्री कानिफनाथांचे वास्तव्य असलेल्या या मंदिराच्या कामासाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च येणार आहे. येथील कै. रुक्मिणी गिरीधारीशेठ यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त दानशुर डहाळे कुटुंबियांनी या मंदिराच्या कामासाठी १ लाख ५१ हजार १५१ रुपयाची देणगी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक झाडे यांच्याकडे सुपुर्द केली, तसेच डहाळे कुटुंबियांनी कृष्णकृपांकित विकासानंद मिसाळ महाराज संतपंढरी पिंपळगाव वाघा यांच्या ट्रस्टला ५१ हजार रुपयांची तर येथील सिताराम संतत्संग परिवारास २१ हजार रुपयाची देणगी दिली. यावेळी ह.भ.प. भागवत महाराज उंबरकर यांनी शेवट तो भला,माझा बहु गोड या अभंगातुन श्रोत्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यात एकदा तरी दान करावे, म्हणजे आयुष्याचा शेवट गोड होईल असे सांगितले.
यावेळी ह.भ.प.जगन्नाथ महाराज गवळी, ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर यांचे संतपुजन केले. या कार्यक्रमास गावातील तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. गिरीधारीशेठ मुरलीधर डहाळे, दिपक गिरीधारी डहाळे, शुभम गिरीधारी डहाळे, प्रशांत गिरीधारी डहाळे यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले.
0 Comments