जनतेने त्यांचे कामे करण्यासाठी मोठ्या अपेक्षेने नेतृत्व निवडून दिलेले असते परंतु राज्यात हल्ली विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जनतेमध्ये नेतुत्वा बाबत नकारात्मक भावना निर्माण झाली असून ती भावना जाणून घेण्यासाठी मतदारसंघातील गावागावात व घराघरात जाऊन कुठल्याही सभा न घेता अगदी साध्या पद्धतीने जनतेच्या भावना समजून घेणार असल्याचे प्रताप काका ढाकणे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,सिताराम बोरुडे,बंडू बोरुडे,राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सविता भापकर,चंद्रकांत भापकर,वृद्धेश्वर कंठाळी,देवा पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ढाकणे यांनी सांगितले कि, माझा कुणाला राजकीय विरोध नाही तसेच आपला कोणी राजकीय शत्रू देखील नाही. मात्र भारतीय राज्यघटनेंना दिलेला अधिकार व हक्क वापरून जनतेत जनजागृती करणे हे माझे कर्तव्य आहे. येत्या काळात केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने शैक्षणिक धोरण अवलंबून चुकीची शिक्षण पद्धती जनतेवर लादणार आहे, त्याबाबत देखील या अभियाना दरम्यान जनजागृती करणार आहे.मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली जात असल्याचा गाजावाजा केला जात असून या कामाचा हिशोब लोकप्रतिनिधिना मागितला असता तो दिला जात नाही परंतु जनतेतून जमा होणारा कर अर्थात शासनाचा पैसा योग्य ठिकाणी खर्च होत आहे का ? त्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे का ? अशा कामांमध्ये गुणवत्ता हा निकष पाळला जातो का ? हे या अभियाना दरम्यान जनतेशी संवाद साधून चर्चिले जाणार आहे.सत्तेसाठी लाचारी पत्करून चुकीचे शैक्षणिक धोरण लादणार असाल तर तुम्ही समाजाचे गुन्हेगार आहात असे देखील यावेळी ढाकणे यांनी सांगितले. सत्तेच्या साठमारीत सगळेच गुलाम झाले असल्याने जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला असल्याची खंत देखील प्रताप ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केली.यादरम्यान पत्रकारांनी ढाकणे यांना ही विधानसभा पूर्व रंगीत तालीम आहे का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे अभियान फक्त आणि फक्त जनतेत जावून जनजागृती करणे व संपर्क वाढवणे यासाठी आयोजित केले असल्याची सांगितले.
0 Comments