पाथर्डी- शेतकऱ्याच्या पशुधनावरती लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून तालुक्यात शेकडो जनावरे लम्पीग्रस्त झाले आहेत. अशा संकटाच्या आपत्काली परिस्थितीमध्ये प्रशासनाला मदतीचा हात सुवर्णयुग तरुण मंडळाने देत सामाजिक जबाबदारी स्वीकारली आहे.मंडळाने लम्पी आजाराच्या पार्श्वभूीवर सुरू केलेली औषध फवारणी उपक्रम हा अत्यंत महत्त्वाचां आणि स्तुत्य आहे.असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांनी केले.
पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाकडून तालुक्यातील ज्या गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रभाव वाढला आहे. त्या गावात मोफत औषध फवारणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ गट विकास अधिकारी गर्जे यांच्या हस्ते शनिवारी पाथर्डी येथील पशु वैद्यकीय दवाखाना येथून करण्यात आला. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश पालवे,पं. स.माजी सदस्य विष्णुपंत पवार,सुभाष केदार, डॉ.नवनाथ भाबड,संजय पालवे,मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे,उत्सव समिती अध्यक्ष सोनल जोजारे,डॉ.अभय भंडारी,मुकुंद लोहिया,गणेश बाहेती,बंडू दानापुरे,योगेश घोडके, सतीश टाक,दिगंबर जोजारे,गोपालसिह शेखावत, प्रशांत पानगे,मुकुंद सुराणा, अभय गांधी,राहुल भगत उपस्थित होते.
डॉ.जगदीश पालवे म्हणाले की,प्रशासनाने लसीकरण मोहीम हाती घेतल्या असून तरीसुद्धा या लम्पीचा फैलावाने शेकडो जनावरे बाधित झाली असून वीस ते पंचवीस जनावरे आलेला लाटेत मृत्युमुखी झाली आहे. आशा आपत्तीच्या परिस्थितीत सुवर्णयुग तरुण मंडळ या सार्वजनिक गणेश मंडळाकडून प्रशासनाला होत असलेली मदत ही लाख मोलाची आहे.कोरोना,रक्तदान शिबिर,पर्यावरण व वृक्ष लागवड आणि संवर्धन, प्राण्यांसाठी पानवठे असे विविध उपक्रम मंडळाकडून होत असून आपत्तीचे काळात मदतीचा हात देणारे प्रशासनाला सुवर्णयुग मंडळांनी मोठे सहकार्य लाभले आहे. प्रास्ताविक वैभव शेवाळे,सूत्रसंचालन अमोल कांकरिया तर आभार मुकुंद लोहिया यांनी.
0 Comments