राजेंद्र जैन / कडा - एखादी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यावर
पहिल्यांदा मदतीला धावून येणारा कुणी असेल तर तो खाकी वर्दीतला माणूस. कडा परिसरात
शनिवारी दुपारनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. सगळीकडे पाणी पाणी... अशातच नगर- बीड
मार्गावरील शेरी (बुद्रुक) पुलावरुन पाणी वाहू लागले. वीज गायब झाली. अंधारात
दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या. प्रवाशांच्या जिवितास धोका होऊ नये. म्हणून
पोनि संतोष खेतमाळस लवाजम्यासह स्वत: भर पावसात रस्त्यावर उतरले. पोलिसांनी
अक्षरश: सायंकाळी सहापासून पहाटे तीन वाजेपर्यंत पावसात थांबून आपत्ती व्यवस्थापन
करुन थोपलेल्या वाहनांसाठी पर्याय वाट करुन दिली. पोलिसांच्या या साहसी कामगिरीचे
नागरीकांतून अभिनंदन होत आहे.
आष्टी तालुक्यात शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर पावसास जोरदार प्रारंभ
झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. ढगफुटीसदृक्ष पावसामुळे
जनजीवन विस्कळीत झाले. सगळीकडे रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी साचले. अशातच नगर- बीड
मार्गावरील शेरी (बुद्रुक) च्या पुलावरुन पाणी वाहू लागले. त्यातच वीजही गायब
झाली. अंधारात दोन्हीकडे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक
खोळंबली. अतिवृष्टी झाल्याने वाहनातील प्रवाशांच्या जीवितास काही धोका होऊ नये.
म्हणून पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस, सपोनि
भाऊसाहेब गोसावी, सपोनि अजित चाटे, प्रविण क्षीरसागर, मजहर सय्यद, सचिन
गायकवाड, दीपक भोजे, अशोक तांबे, हनुमंत
बांगर, रविराज निमसे, विकास जाधव, गुंडाळे, वाहनचालक घोडके हे पोलिस कर्मचारी पडत्या
पावसात रस्त्यावर उतरले. या पोलिसांनी अक्षरश: सायंकाळी सहा वाजेपासून तर पहाटे
तीन वाजेपर्यंत रात्रभर पावसात थांबून उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन करुन प्रवाशांना
मदतीचा हात दिला. याप्रसंगी पोलिसांनी आष्टीकडून येणारी वाहने शिराळ मार्गे नगरकडे
पाठवून दिली तर नगरकडून येणा-या वाहनांना कडा येथील डाॅ. आंबेडकर चौकात थांबवून
पर्याय मार्गाने रवाना करुन दिले. नाव पोलिस... पण, कधी कधी स्वत:ताच आनंद ओलिस ठेवून त्याला आपत्कालिन परिस्थितीत
मदतीला धावून यावे लागते. खाकी वर्दीतला पोलिस सामान्यांसाठी संकटात काय करु शकतो, याचं उत्तम उदाहरण शनिवारच्या ढगफुटी पावसात
पोलिसांनी केलेल्या साहसी कामगिरीमुळे प्रवाशांना अनुभवायला मिळाले.
याबाबत पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस यांनी सांगितले कि आष्टी ते
साबलखेडपासून चारपदरी रस्त्याचे काम चालू असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने
अपघाताची शक्यता असते. त्यामुळे रात्री-अपरात्री वाहने चालविताना खड्ड्यांचा अंदाज
घेऊनच चालवावीत.
0 Comments