अहमदनगर जिल्ह्यातील वेटलिफ्टिंग खेळाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदक विजेते खेळाडू घडविणारे, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा. विजय देशमुख यांची सर्वानुमते महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली येथे महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेची निवडणूक बिनविरोध होऊन नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेच्या अध्यक्षपदी सुधीर म्हाळसकर (पुणे) उपाध्यक्षपदी प्रवीण व्यवहारे (नाशिक) सचिवपदी संतोष सिंहासने (सांगली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे डॉ. मयूर पटेल व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे खजिनदार ॲड. धनंजय भोसले व निवडणूक अधिकारी प्रीतम सांबरे यांच्या उपस्थित पार पडली.
महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड. उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, सतीश रासकर, डेव्हिड मकासरे, रवींद्र सांगळे प्रा. महेश निंबाळकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments