येथील संस्कार
भवन मध्ये प्रताप ढाकणे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने सुप्रिया सुळे
यांच्या उपस्थितीत परिसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या
प्रदेशाध्यक्ष रोहीणी खडसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,युवा आघाडीचे संदिप वर्पे ' ज्येष्ठ नेते
चंद्रकांत म्हस्के ' महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे,शेवगाव तालुकाध्यक्ष
कलयाण नेमाणे, अॅड शारदा लगड,' अभिषेक कळमकर,सविता भापकर,रत्नमाला उदमले आदि
सह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थीत होते.
खासदार सुळे
यांनी मोहटा देवी गडावर जाऊन दर्शन घेतले. पंकजा मुंडे यांचा या भागावर अधिक
प्रभाव असल्याचे त्यांनी भाषणातून आवर्जुन सांगीतल. सुळे म्हणाल्या पवारांना हुकूमशहा
काय म्हणता, अन्य आरोप करून वार करता, आपण सगळे मोहटा देवीला येऊ ! कोण खरे, कोण खोटे याची शपथ
घेऊ,देवीचा चमत्कार पाहू राज्यात महा विकास आघाडी सरकार आल्यावर कंत्राटी
कामगारांच्या आदेशाची होळी करू. बंद केलेल्या शाळा पुन्हा सुरु करुन यापुढे एक जरी
शाळा बंद केली तर तीव्र विरोध करू. दारू दुकानांऐवजी शाळा वाढवणारे सरकार देऊ.
त्यांच्याकडे पक्ष फोडायला ' घरे फोडायला पैसे आहेत . पण नांदेडच्या रुग्णालयात औषधे दयायला
पैसे नाहीत. निर्लज्ज सरकार नांदेडच्या घटनेबाबत क्लीन चीट देतेय.
भारतात एक
अदृष्य शक्ती खासदार फैजल यांना अटक करते ' ठाकरेंचा पक्ष फोडते 'राष्ट्रवादी
कॉंग्रेसला अडचणीत आणते , त्याच शक्तीने देवेंद्र फडणविसांना सुध्दा मुख्यमंत्र्यांचे
उपमुख्यमंत्री व त्यातही पुन्हा हाफ उपमुख्यमंत्री करते . आपण फडणविसांच्या
विरोधात लढण्यास तयार आहोत. उस तोडणी कामगारांना सर्वतोपरी न्याय मिळून कराराची
मुदत पाच ऐवजी तीन वर्षाची करण्यासंबंधीची मागणी शरद पवार यांचे निदर्शनास आणू .
तोडणी कामगार संपा संबंधी यापुर्वी पंकजा यांनी वेळोवेळी पवार साहेबांशी चर्चा
केली आहे. पक्षीय विचार वेगळे असले तरी कामगार हिताबाबत त्यांची तळमळ होती. आम्ही
नेहमीच पंकजा यांचा सन्मान करू. राजकिय दडपशाहीने राजकारणाचा खेळखंडोबा मांडून
ठेवलाय. पंकजा मुंडे यांना लोकांनी खूप प्रेम दिले. ताई, आता खूप झाले. चला , आता आमच्या बरोबर,अशा शब्दात त्यांनी पंकजा यांना भावनिक साद
घातली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदारेश्वर चे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, सूत्रसंचालन गणेश
सरोदे तर आभार योगेश रासने यांनी मानले..
- शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यासह माजी सभापती क्षितिज घुले असे घुले परिवाराचे कोणीही सदस्य कार्यक्रमाला नव्हते एवढेच नव्हे तर बॅनरवर घुले परिवाराच्या कुणाही सदस्याचा फोटो नव्हता यावरून घुले परिवार अजित पवारांच्या गटामध्ये सामील झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
0 Comments