पाथर्डीत कापूसचोरानी केला शेतकऱ्याचा खून !

मिरी - पाथर्डी तालुक्यातील मिरीहुन जवळच असलेल्या कडगाव शिवारात कापसाची चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात कडगाव शिवारातील कारभारी शिरसाट या शेतकऱ्याचा जागीच दुर्देवी मृत्यु झाला.
          पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारातील मोहोज ते मिरी रस्त्यावर कारभारी रामदास शिरसाट (वय ५५ वर्षे) यांची वस्ती आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये १०-१२ गोण्यात कापूस भरुन ठेवला होता त्या गोण्या चोरटे घेवुन जात होते. चोरटे जवळच्या ऊसात कापसाच्या गोण्या नेऊन ठेवीत असताना कारभारी शिरसाट यांना जाग आली आणि त्यानंतर चोरट्यांनी शिरसाट यांच्यावर हल्ला केला. चोरट्यांच्या हल्ल्यात कारभारी शिरसाट हे जागीच ठार झाले. ही घटना दुसर्या दिवशी शिरसाट यांच्या कुटुंबियांच्या लक्षात त्यांनी ही घटना पाथर्डी पोलिस स्टेशनला कळविली. त्यानंतर काही वेळातच पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संतोष मुटकुळे, डिवायएसपी सुनिल पाटील उप अधिक्षक प्रशांत खैरे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
             पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा गतिमान केली आहे. श्वानपथक, ठसेतज्ञ यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणेला मदत केली आहे. कारभारी शिरसाट अतिशय कष्टाळू आणि गरीब शेतकरी होते त्यांचा एक मुलगा सैन्य दलात आहे तर दुसरा इंजिनियर आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती समजताच इंजिनीयर मुलगा नगरहून कडगाव येथे आल्यानंतर कारभारी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिरसाठ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कडगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



 

Post a Comment

0 Comments