आम आदमीची संविधान संवाद दिंडी !

 

पाथर्डी- आम आदमी पक्षाच्या वर्धापन दिन व संविधान दिनाच्या निमीत्ताने आम आदमी पक्षाच्या जिल्हा संघटनेकडून तालुक्यातील अकोले येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनापासून सुरु झालेली संविधान दिंडी प्रजासत्ताक दिनापर्यंत संपुर्ण नगर जिल्हयातील विविध तालुक्यात जावून तेथे जनेतेशी संविधान संवाद केला जाणार असल्याची माहीती आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव व संवाद दिंडीचे समन्वयक सुभाष केकाण यांनी दिली.

आम आदमी पक्षाच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात आज राज्य सह प्रभारी गोपाल भााई इटालीया व राज्य संघटन सचीव अजीत फाटके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात पक्षाच्या वर्धापन दिनानिमीत्त विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. जिल्हयाच्या वतीने आज पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे संविधान संवाद दिंडीचा मुख्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजी. प्रकाश फराटे, प्रा. अशोक डोंगरे, अ‍ॅड. विद्या शिंदे, विजय शिंदे, श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे, नेवाशाचे संदीप आलवणे, संविधानाचे अभ्यासक देवराम सरोदे, प्रविण तिरोडकर, आण्णाभाऊ लोंढे, शेवगांवचे अशोक लोंढे, दादासाहेब बोडखे, शरद शिंदे, ज्ञानदेव शहाने, कुमार भोंडे, संजय डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, अकोलेचे ग्रा.पं.सदस्य गोरक्ष धायतडक, शहादेव गर्जे, वसंत पाटील गर्जे, काशीनाथ गर्जे, माजी चेअरमन बबन नाना गर्जे, दिनकर केकाण, अ‍ॅड. बालाजी गर्जे, हबीबभाई शेख, सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन कृष्णा धायतडक, आय्याश शेख, माजी संचालक छबुभाई शेख, बाळासाहेब साबळे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव म्हणाले की,केंद्र सरकारच्या विरोधात आपचे नेते बोलतात, त्यांच्या धोरणावर टिका करतात. केद्रातील सरकारला टिका मान्य नाही. लोकशाही मान्य नसल्याचे आपचे नेते मनिष सिसोदीया व खा. संजय सिंग यांना जेल मध्ये ठेवले आहे. अरविंद केजरीवालांना देखील लवकरच अटक होईल अशा हालचाली सुरु आहेत. भ्रष्टाचारी नेत्यांना अभय व प्रामाणीक मानसाला तुरुंग अशी केंद्र सरकारची निती आहे. मात्र आम आदमी पार्टी याला भिक घालत नाही. देशातील सामान्य नागरीक आपच्या मागे खंबीरपणे उभा आहे.

संविधान संवाद दिंडीचे समन्वयक  सुभाष केकाण म्हणाले की,  संविधान शिकणे, समजणे, उमजणे म्हत्वाचे आहे. संविधान समजले तरच सामान्य मानून प्रस्थापीत व्यवस्थेला उलथवू शकतो म्हणून आपच्या वतीने या संविधान संवाद दिंडीचे आयोजन केले आहे. या काळात आपची सभासद नोंदणी करुन सामान्य मानसाला राजनैतीक न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे म्हणाले. यावेळी राम लाड, संविधानाचे अभ्यासक देवराम सरोदे अकोलेचे युवा नेते जयदत्त गर्जे यांची भाषने झाली. आभार किसन आव्हाड यांनी तर सुत्रसंचालन जयदत्त गर्जे यांनी केले.

यावेळी संविधान संवाद दिडींचा शुभारंभ झाला. संविधान उद्देशीकेचे यावेळी सामुहीक वाचन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी ध्वजारोहन कार्यक्रम सरपंच नारायण पालवे उपसरपंच जया महादेव गर्जे , संभाजी गर्जे, उध्दव माने यांच्या उपस्थित झाले.


Post a Comment

0 Comments