पाथर्डी – पुस्तक वाचनातून सुसंस्कृत
समाज घडतो व सुसंस्कृत समाज हा बलशाली राष्ट्र उभारणीसाठी अत्यावश्यक आहे, भारत देशाचे
संविधान जगात आदर्श असून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा अंगीकार करणे अत्यावश्यक
असल्याचे मत मा.पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील माणिकदौडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य तथा वाचनालयाचे अध्यक्ष विष्णुपंत पवार बोलत होते.यावेळी दत्तात्रय आठरे, धोंडीराम पवार, नवनाथ जीवडे, गोरख कोठे, बाबासाहेब गायके, गोरख चितळे, फैयाज पठाण आणि ग्रंथापाल प्रदीप पवार उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करून एकात्मतेची व संविधान अंगीकारण्याची शपथ घेतली. प्रास्ताविक गोरक्ष चितळे तर आभार प्रदीप पवार यांनी मानले.
0 Comments