करंजी ग्रामपंचायत निवडणुकीचा हायटेक प्रचार !

 

करंजी - पाथर्डी तालुक्यातील राजकीयदृष्या महत्वाच्या करंजी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असुन जेष्ठनेते बाळासाहेब अकोलकर यांच्या पॅनलची लढत शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख रफिक शेख यांच्या पॅनलबरोबर होत आहे. 

पाथर्डी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक करंजी ग्रामपंचायत आहे. १३ सदस्य व सरपंच असा १४ जागासाठी ही निवडणुक होत असुन चार हजाराच्यावर मतदार या निवडणुकीत मतदान करुन उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. सरपंचपद महिलासाठी असल्याने रफिक शेख यांच्या पॅनलकडुन त्यांच्या पत्नी सौ. नसीम रफिक शेख या उमेदवार आहेत तर बाळासाहेब अकोलकर यांच्या पॅनलकडुन सौ. विजया आबासाहेब अकोलकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दोन्ही गटाकडुन हायटेक प्रचार यंत्रणा राबविली जात असुन मतदारांच्या गाठीभेटीवर व बैठकीवर जोर दिला जात आहे. रफिक शेख यांच्या पॅनलकडुन शरद अकोलकर, सुरेशनाना साखरे, अशोक अकोलकर, सुनिल अकोलकरसह नेत्यांनी कंबर कसली आहे तर बाळासाहेब अकोलकर यांच्या पॅनलकडुन ॲड. मिर्झा मणियार, सुनिलशेठ साखरेसह अनेक मान्यवर प्रचारात सहभागी झाले आहेत. 

             ऐन निवडणुकीच्या तोंडावर गावातील आदर्श शिक्षक विजय अकोलकर गुरुजी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा कळीचा मुद्दा ठरत असून या गुन्हा मुळे त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचे पडसाद या निवडणुकीवरही उमटत आहेत.

Post a Comment

0 Comments