मिठाई व्यापाऱ्याला लुटणारा आरोपी जेरबंद !

 


पाथर्डी – तिसगाव येथील मिठाई व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून लुटणाऱ्या स्थानिक आरोपीस पाथर्डी पोलिसांनी जेरबंद केले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी कि. दिनांक ०२/११/२०२३ रोजी रात्री २३.०० वा.चे सुमारास फिर्यादी नामे गजेंद्रसिंग नखतसिंग राजपुरोहित हे त्यांचे तिसगांव ता. पाथर्डी येथील बालाजी स्विट होम हे दुकान बंद करुन दिवसभराचे धंद्याचे ३८,४००/- रुपये रोख रक्कम घेवून त्यांचे स्कॉर्पिओ गाडी नंबर एमएच-४०-एएम-५६१२ मधुन घरी जात असतांना आरोपी नामे १) सिकंदर जलाल पठाण २) आरिफ हासन पठाण ३) बाबा इलियास जाकीर शेख सर्व रा. तिसगांव ता. पाथर्डी यांनी रस्त्यात फिर्यादीची गाडी आडवुन फिर्यादीचे गाडीचा दरवाजा उघडुन फिर्यादीचे तोंडवर, पाठीवर व हातावर दगडाने व हाताने मारहाण करुन आरोपीतांनी फिर्यादीचे खिशातील ३८,४००/- रुपये रोख रक्कम बळजबरीने काढुन घेतली होती. त्याबाबत फिर्यादी गजेंद्रसिंग नखतसिंग राजपुरोहित वय ३२ वर्षे रा.झाबरा, ता. पोकरण जि.जैसलमेर (राजस्थान) ह.रा. वैभवनगर, तिसगांव ता.पाथर्डी यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन वरील आरोपीतांविरुध्द पाथर्डी पोलीस स्टेशनला गु.र.नं. ११२६/२०२३ भादंविक ३९४,३४१,३४ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवून त्यांना गुन्हयाचे कामी अटक करणेबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे विलास जाधव, पोलीस उपनिरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन, पोहेकॉ. अल्ताफ शेख, पोहेकॉ. आजिनाथ बडे, पोना. अनिल बडे, पोना. अभयसिंह लबडे यांनी चार तासाचे आंत सदर गुन्हयातील आरोपी नामे सिकंदर जलाल पठाण वय ३३ वर्षे रा. तिसगांव ता.पाथर्डी याचा शोध घेवून त्यांस सदर गुन्हयाचे कामी केली आहे. उर्वरीत आरोपीतांचा तपास चालु आहे.

Post a Comment

0 Comments