चोरट्यांची नजर आता शेतकऱ्यांच्या शेती अवजारावर !


पाथर्डी – तालुक्यातील घुमटवाडी येथून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणातून ट्रॅकटरचे अवजारे रोटा व्हेटर,सारायंत्र,काकऱ्या तसेच पेरणी यंत्र असे शेती उपयोगी साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेहली असून याबाबत शेतकरी रामराव चव्हाण यांनी पोलिसात चोरीची फिर्याद नोंदवली आहे.

घुमटवाडी येथील रहिवासी रामराव चव्हाण यांनी त्यांचे शेती उपयोगा करिता महिंद्रा कंपनीचे जिओ ट्रॅकटर व त्या सोबतचे आवश्यक अवजारे रोटा व्हेटर,सारायंत्र,काकऱ्या तसेच पेरणी यंत्र असे साहित्य विकत घेतले होते.घुमटवाडी येथील शेत घराच्या अंगणात सदरील साहित्य ठेवलेले होते,अंगणात सीसीटीव्ही देखील बसवलेला होता मात्र दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेनेचे सुमारा पासून ते ८ डिसेंबर रोजीचे दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही तोडून शेती उपयोगी साहित्य चोरून नेहली असून याबाबत शेतकरी रामराव चव्हाण यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांना याबाबत म्हत्वाचे धागेदोरे मिळाले असून त्या अनुषंगाने तपास सुरु करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments