मयत सैनिकाची संपत्ती विक्री करणारावर गुन्हे दाखल करा – त्रिदल सैनिक संघ

पाथर्डी – शहरातील आनंदनगर येथील मयत सैनिकाच्या नावे असलेला खुला प्लॉट बनावट व्यक्ती उभा करून त्रयस्त इसमाला विक्री करून मयत सैनिक अजिनाथ सहदेव काळे यांच्या वारसांची फसवणूक केल्या प्रकरणी संबधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी,भिंगार तसेच आष्टी येथील त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले तसेच दुय्यम निबंधक अनिल जव्हेरी यांच्या दालनात संघटनेच्या माजी सैनिकांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

मौजे पाथर्डी ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथील सर्व्हे नं. 25/2 पैकी प्लाट नंबर 70 विक्री क्षेत्र 75.00 चौ.मी अश्या वर्णनाचा खुला प्लॉट सैनिक अजिनाथ सहदेव काळे  यांचे नावे होता मात्र अजिनाथ काळे हे मयत झाल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात आरोपींनी दि.05/06/2023 रोजी खरेदीखत दस्त क्रमांक 2103/2023 मध्ये लिहुन देणार अजिनाथ शहादेव काळे रा. हाकेवाडी पोस्ट मोहोजदेवढे ता.पाथर्डी जि. अहमदनगर यांच्या ऐवजी खोटी कागदपत्रे तयार करून बनावट व्यक्ती उभा करून अज्ञात आरोपीने ती स्वतः अजिनाथ शहादेव काळे आहे असे भासवुन, बनावट आधार कार्ड चे ओळखपत्र तयार करून दस्त या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविण्यात आलेला आहे. सदरची मिळकत ही उपरोक्त खरेदीखताचा दस्तान्वये प्रदिप विष्णू गायकवाड रा.ढाकणवाडी पोस्ट खरवंडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांस विक्री केलेली आहे. सदर प्रकरणी अर्जदार अजिनाथ शहादेव काळे यांचे पत्नी द्वारका अजिनाथ काळे रा. हाकेवाडी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे दि.29/11/2023 रोजी अर्ज केलेप्रमाणे, वरील दस्तातील लिहुन देणार श्री. अजिनाथ शहादेव काळे हे दिनांक 6/1/2023 रोजी मयत झाले असून अज्ञात व्यक्तीने मीच अजिनाथ शहादेव काळे आहे असे भासवून त्यांनी बनावट आधारकार्ड बनवून आमच्या मालकीचा प्लॉट त्रयस्त व्यक्तीस विक्री करून आमची फसवणूक केलेली आहे, अशा प्रकारचा अर्ज या कार्यालयास सादर केलेला आहे.

सदर बनावट दस्तात नमुद केल्याप्रमाणे लिहुन घेणार व लिहुन देणार यांची ओळख पटवून देणारे साक्षीदार १) प्रविण गौतम गायकवाड रा. शिरुर का. ता. शिरुर का.जि बीड, २) सोमनाथ रमेश काळोखे रा. पाथर्डी जि.अहमदनगर हे असून अर्जदार यांनी अर्जासोबत श्री अजिनाथ शहादेव काळे यांचे मृत्युचा दाखला व श्री अजिनाथ शहादेव काळे यांचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत दिली असुन, त्यावरून नोंदणी अधिनियम 1908 च्या अधिनियमानुसार गुन्हा घडलेला आहे त्यानुसार अज्ञात व्यक्ती जी अजिनाथ शहादेव काळे यांच्या ऐवजी त्यांचे जागी उभा करण्यात आलेली व्यक्ती दस्तात नमुद केल्याप्रमाणे पत्ता - रा. हाकेवाडी पो. मोहोजदेवढे ता.पाथर्डी जि. अहमदनगर २) लिहून घेणार व दस्त कार्यालयात सादर करणारा ता. पाथर्डी जि. अहमदनगर – 414102 ३) प्रदिप विष्णू गायकवाड रा. ढाकणवाडी पोस्ट खरवंडी ३) दस्तातील लिहुन घेणार व लिहुन देणार यांची ओळख पटवून देणारे खालील दोन साक्षीदार ४) प्रविण गौतम गायकवाड रा.शिरुर का. ता. शिरुर का. जि. बीड ५) सोमनाथ रमेश काळोखे रा. पाथर्डी जि. अहमदनगर 414102 या इसमांनी फसवणुक करून अजिनाथ शहादेव काळे याचे नावाचे बनावट आधारकार्ड सारखे ओळखपत्र तयार करून ते खरे आहे असे भासवुन त्याचा वापर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पाथर्डी येथील कार्यालयामध्ये शासकीय कामकाजाकरीता वापर करून फसवणुक केली आहे. म्हणुन या इसमाविरूध्द नोंदणी अधिनियम 1908 च्या अन्वये व भा.द.वि. कलमानुसार दुय्यम निबंधक अनिल रामसिंग जव्हेरी वय 52 वर्ष धंदा / नोकरी / नेमणुक- दुय्यम निबंधक पाथर्डी ता.पाथर्डी जि. अहमदनगर यांनी फसवणुकीची फिर्याद देण्यासाठी पोलिसात लेखी पत्राने मागणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी ४ वाजे पर्यंत सुरु होती.  

यावेळी त्रिदल सैनिक संघ पाथर्डी,भिंगार तसेच आष्टी यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, रोहिदास एडके,विठ्ठल तांदळे,रामराव चेमटे,म्हातारदेव आव्हाड,मधुकर चन्ने,अशोक देवढे,प्रभाकर फुंदे,सुधाकर आव्हाड,रमेश कराळे,किशोर शिरसाट,रामनाथ भाबड,चांद पठाण,रामकिसन कुटे,महादेव आंधळे,ज्ञानेदेव जगताप,भानुदास केदार,नवनाथ आव्हाड,बद्रीनाथ मरकड तसेच आष्टी येथील सानिक बांधव  संजीव फसले,नवनाथ भगत,श्रीराम माने,बबन दहिफळे,विश्वनाथ नेटके,कैलास पाखरे,सीएम खंदारे, शामराव हंगे,संजय गायकवाड,अमृत ढोबळे,भाऊसाहेब काळे,सुभाष महाजन,बाळासाहेब लोखंडे,संतोष आवटे,दादासाहेब ठोंबरे,संजय चौधरी,अशोक शिंदे,हनुमान झगडे,नारायण तळेकर,भाऊसाहेब चौधरी,राजेंद्र पवार आदी आजी माजी सैनिक बांधव उपस्थित होते.

  

Post a Comment

0 Comments