वेटलिफ्टींग स्पर्धेत योगिताला सुवर्ण तर हर्षदाला कास्यपदक

पाथर्डी - आदिकवी नानया विद्यापीठ, राजमुंद्री, आंध्र प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी योगिता खेडकर हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना ८७ किलो वजन गटात एकूण १८६ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले .

तर हर्षदा गरुड हिने ४५ किलो वजन गटात एकूण १४७ किलो वजन उचलून कांस्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुलींच्या संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. तसेच या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमधून आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी ६७ किलो वजन गटात संजय लोखंडे, १०२ किलो वजन गटात प्रतीक शिळवणे व १०९ किलो वजन गटात गौरव डोईजड यांची निवड झाली आहे. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments