कडा-शिरापूर रस्त्याचे निकृष्ट काम ग्रामस्थांनी बंद पाडले !

कडा / वार्ताहर - अत्यंत दुरावस्था झालेल्या कड्यापासून शिरापूर पर्यंतचा रस्त्याच्या कामाला मोठ्या प्रतिक्षेनंतर सुरुवात झाली. मात्र, या कामाच्या ठेकेदाराकडून पाच किमी अंतराच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून, या रस्त्यावरची खडी अक्षरश: हातानेच उखडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे.

आष्टी तालुक्यातील कडा ते शिरापूर हा पाच किमी अंतराच्या या रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दुरावस्था अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. सदर रस्ता मेहकरी, पिंपळगांव दाणी, निमगांव बोडखा, वाहीरा अशा गावांना जोडणारा आहे. दरम्यान, आ. सुरेश धस यांच्या पाठपुराव्यानंतर तीन कोटी ७३ लाखाच्या या रस्ता कामाला अखेर सुरुवात झाली. मात्र, या कामावरील ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असून, हा रस्ता अक्षरश: हाताने अलगद रस्ता उखडत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हे काम काम बंद पाडले आहे. ठेकेदाराकडून उत्कृष्ट दर्जाचे रस्ता काम होत असेल तरच कामाला सुरुवात करावी. नसता काम बंद ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी टाकळीचे सरपंच सावता ससाणे, ग्रा.पं. सदस्य गौतम कर्डीले, शंकर कर्डिले, बाळासाहेब कर्डीले, रजणीकांत कर्डिले, कृष्णा गलांडे, बंडु साके, सागर कर्डीले, साके महाराज, सतिष भालेराव, रघूनाथ कर्डिले, देविदास कर्डिले, रणजित कर्डिले आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments