अहमदनगर, आष्टी ते अमळनेर हायस्पीड रेल्वेची चाचणी

राजेंद्र जैन/  कडा - अहमदनगर, न्यु आष्टी ते अमळनेर या तीस किमी दरम्यान तासी ११० च्या वेगाने धावणा-या हायस्पीड रेल्वेची चाचणी नुकतीच संपन्न झाली. येत्या आठ ते दहा दिवसात ही रेल्वे चालू होण्याची शक्यता आहे. मात्र ही रेल्वेसेवा सूरु झाल्यानंतर परिसरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.                                                                                      अहमदनगर, न्यु आष्टी ते अमळनेर या तीस किमी अंतराच्या मार्गावर धावणा-या हायस्पीड या रेल्वेची चाचणी नुकतीच घेण्यात आली. ही हायस्पीड रेल्वे पाहण्यासाठी नागरीकांनी ठिकठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या रेल्वे मार्गावर धावणा-या हायस्पीड रेल्वेच्या तांत्रिक चाचण्या यापुर्वी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठांकडून लवकरच अहवाल सादर करण्यात आल्यानंतर सदर रेल्वे प्रवाशांसाठी नियमित सेवा सुरु होण्याची शक्यता वरिष्ठ रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येते. या हायस्पीड रेल्वेचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्यामुळे या वेगवान रेल्वेला पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती.

 

Post a Comment

0 Comments