ओवी ज्ञानेशाची स्पर्धेचे बक्षीस वितरण


पाथर्डी - ज्ञानेश्वरी ग्रंथातील वैज्ञानीक ओव्यांची ओवी विश्लेषणाची महाराष्ट्रातील एकमेव आगळीवेगळी स्पर्धा परिक्षा ॲङ बाळासाहेब बोडखे मागील तीन वर्षापासुन आयोजीत करीत आहेत. यावर्षी स्पर्धेचे चौथे वर्षे होते. या स्पर्धेत आळंदी देवाची येथील श्री. मधुकरराव पांचाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सौ. सुनिता चंद्रशेखर पाठक, छञपती संभाजीनगर आणि श्री. योगेश गोरक्षनाथ गर्जे, खिळद यांनी दुसरा क्रमांक मिळविला तसेच सौ. वर्षा ज्ञानेश्वर आघाव-बडे, बीड आणि श्री. प्रकाश शंभा केळुसकर सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यांना तृतीय क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. 

31 डिसेंबर 2023 रोजी येडेश्वरी मंदीर खिळद येथे ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षा 2023 चा बक्षिस वितरण समारंभ पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांकास रू.5000/-, दुस-या क्रमांकास रू.3000/-  आणि तृतीय क्रमांकास रू.2000/- रोख रकमेचे बक्षिस ज्ञानेश्वरी ग्रंथ, प्रशस्तीपञक, शाल देवून ह.भ.प.श्री. गुरूवर्य श्री. सुदर्शन महाराज यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी कु. दिव्या गोविंद आडकर, केरूळ, सौ. कांता विठ़ठल वाळुंज आणि सौ. आशा नितीन अनारसे यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख रक्कम रू.1000/-, ज्ञानेश्वरी ग्रंथ, प्रशस्तीपञक देवून ह.भ.प.श्री. गुरूवर्य श्री. सुदर्शन महाराजांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. 

यावर्षी ओवी ज्ञानेशाची मंडळाने ह.भ.प. गुरूवर्य श्री. सुदर्शन महाराज, पुरी संस्थान, सांगवी पाटण यांच्या 87 व्या वर्षानिमित्त भव्यदिव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत केला होता. यावेळी महाराजांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने ॲङ बाळासाहेब बोडखे यांनी 100 ज्ञानेश्वरी अर्थासहीत ग्रंथ श्री. गुरूवर्य सुदर्शन महाराजांच्या हस्ते स्पर्धेक, आणि गुरूपुजनासाठी आलेल्या 51 श्री व सौ च्या जोडप्यांना सप्रेम भेट देण्यात आले. श्री. सुदर्शन महाराजांचे अभिष्टचिंतनानिमित्त वेदशास्ञी आडकर देवा पाटणकर यांच्या पौरोहित्याधिकारात सकाळपासुनच येडेश्वरी देवी अभिषेक, सप्तशती हवन, नवग्रह होमहवन करून गुरूवर्य सुदर्शन महाराजांच्या हस्ते यज्ञाला पुर्णाहुती देण्यात आली. गुरूवर्य श्री. सुदर्शन महाराजांचे ॲङ बाळासाहेब बोडखे, सह खिळद, पाटन, लिंबोडी, बावी येथील 51 श्री व सौं च्या जोडप्यांच्या हस्ते गुरूपूजन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. गुरूवर्य श्री. सुदर्शन महाराज हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री. जगन्नाथ काळे गुरूजी, ॲङ एस.एम. नन्नवरे, ॲङ भालचंद्र गोस्वामी, ॲङ आर.डी.येवले, ॲङ ए.आर.डाके, उदयोजक, श्री. रामकिसन फुंदे, महंत हभप श्री. आदिनाथ महाराज, येडेश्वरी संस्थान खिळद, सरपंच सौ. तुळसाबाई गर्जे, श्री. बलभिमराव सुंबरे, हभप. श्री. निळकंठ महाराज तावरे आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी ॲङ बाळासाहेब बोडखे यांनी प्रस्तावीकपर भाषणात ओवी ज्ञानेशाची स्पर्धेचा उद़देश सांगीतला. ज्ञानेश्वरीचा वैज्ञानिक दृष्टीकोनातुन अभ्यास व्हावा, शास्ञ म्हणुन अभ्यास व्हावा यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगीतले. ॲङ बाळासाहेब बोडखे पुढे म्हणाले की, गुरूवर्य सुदर्शन महाराज यांनी सन 1972 पासुन सांगवी पाटण, खिळद व परिसरातील अनेक गावामधील अज्ञानी, अडाणी लोकांना सन्मार्गाला लावून वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. संत विचार रूजविण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. स्वत:साठी आयुष्यात एकही ऐषआरामाची वस्तु खरेदी न करता वैराग्यपुर्ण जीवन जगले. त्यांचा गौरव करून आपण ऋणातुन मुक्त होवू शकत नाहीत. परंतु, अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजीत करण्यात आल्याचे ॲङ बाळासाहेब बोडखे यांनी सांगीतले. 

सन 1965 ते 1991 या कालावधीत खिळद येथे शिक्षक म्हणुन सेवा केलेले पारगांव जोगेश्वरी येथील श्री. काळे गुरूजी हे खिळद गावाला धार्मिक संस्कार देणारे गुरूजी आहेत. काळे गुरूजी खिळद येथे येण्यापुर्वी खिळद मध्ये किर्तन, भजन, हरिपाठ असा कोणताही प्रकार ऐकण्यात नव्हता. परंतु, संत वामनभाउंच्या सहवासात काळे गुरूजींनी खिळद येथे सर्व गावाला संस्कार दिले. गहिनीनाथ गडावर दिंडी नेणे, दररोज हरीपाठ करणे असे उपक्रम राबविले. सन 1972 मध्ये गुरूवर्य श्री. सुदर्शन महाराज यांना संत वामनभाउंनी सांगवीकर ग्रामस्थांच्या मागणीनुसार सांगवी येथील पुरी संस्थानवर मठाधिपती म्हणुन स्थापीत केले. या सर्व घटनांची माहिती श्री. काळे गुरूजी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिली. ॲङ बाळासाहेब बोडखे यांचे पहिले ते सातवी पर्यंतचे शिक्षण श्री. काळे गुरूजीकडेच झाले. काळे गुरूजींचा ओवी ज्ञानेशाची मंडळ व खिळद ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

ॲङ भालचंद्र गोस्वामी यांनी आपल्या भाषणात सांगीतले की, जनीजर्नादन संस्थानाकडे सच्चिदानंद बाबांची हस्तलिखीत मुळ ज्ञानेश्वरी प्रत होती. सन 1909 मध्ये जनीजर्नादन संस्थानाकडुन श्री. राजवाडे यांना सदरील हस्तलिखीत प्रत देण्यात आली. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या मुळ प्रती सांभाळण्याचे महत्वाच्या जनीजर्नादन संस्थानाच्या कार्याबद़दल सविस्तर माहिती त्यांनी दिली.ॲङ एस.एम.नन्नवरे यांनी आपल्या भाषणात सांगीतले की, ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षेमुळे मला ज्ञानेश्वरीतील विज्ञान समजले, तसेच धार्मिक ग्रंथाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. ह.भ.प. निळकंठ महाराज तावरे ,महंत हभप श्री. आदिनाथ महाराजांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. 

ओवी ज्ञानेशाची स्पर्धेचे सह आयोजक ह.भ.प. श्री. देविदास महाराज खिळदकर यांनी गुरूवर्य सुदर्शन महाराज यांचे जीवनचरिञ दस्तुरखुदद श्री. सुदर्शन महाराजांच्या समोर कथन केले. गुरूकृपेमुळे मी कुठलेही शिक्षण घेतलेले नसतांनाही आज किर्तनकार, कथाकार होवू शकलो असे श्री. देविदास महाराजांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमात श्री. सुदर्शन महाराज यांची सेवा करणा-या पुणे येथील उदयोजक श्री. रामकिसन फुंदे यांचा मंडळाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

मागील तीन वर्षापासुन ओवी ज्ञानेशाच्या स्पर्धा परिक्षेचे परिक्षक म्हणुन प्रा. डॉ. सोपानराव निंबोरे यांनी काम पाहीले. निष्पक्ष व अचुक परिक्षणामुळे आयोजकांना मोठे सहकार्य झाले. 

या कार्यक्रमप्रसंगी डॉ. श्रीराम गर्जे,मा. सरपंचकिरण गर्जे, भाउसाहेब गर्जे, नंदु सर, पांडुरंग गर्जे, नवनाथ सातपुते, नवनाथ व्हिडीओ शुटींगवाले, अशोक हॉटेलवाले, सुरेशशेठ दुकानदार, बाळासाहेब चेअरमन, जय भगवान उदयोग समुहाचे मालक श्री. उध्दव गर्जे, संदिप रेशन दुकानदार, रामभाउ गर्जेभागवत बोडखे, ॲङ नितीन बोडखे व गावातील सर्व तरूणांनी आणि जेष्ठ लोकांनी खुप सहकार्य केले त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचालन वाणीभुषण ह.भ.प. श्री. देविदास महाराज यांनी केले. या कार्यक्रमास खिळद, बीडसह, नगर, पुणे, संभाजीनगर, जिल्हयातील ज्ञानेश्वरी अभ्यासक उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे गुरूवर्य सुदर्शन महाराज आजारी असतांना ज्ञानेश्वरी अभ्यासकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुण्याहुन आले होते. ओवी ज्ञानेशाची मंडळाचे सह आयोजक श्री. पांडुरंग गर्जे पोष्टमास्तर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली. 


Post a Comment

0 Comments