रेल्वे इंजिनच्या धडकेत वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

 

कडा / वार्ताहर - अहमदनगर ते अमळनेर या रेल्वे मार्गाच्या इलेक्ट्रिकरणाचे काम सध्या चालू असल्याने मालाची वाहतूक करण्यासाठी इंजिन धावत असते. या इंजिनच्या धडकेत एका वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

आष्टी तालुक्यातील चिंचोली येथील गवळीवस्तीवरील लाभा दिंगाबर गवळी हा वृध्द शेतकरी घरापाजवळ असलेल्या शेतातून बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान येत असताना याच परिसरात रेल्वे इलेक्ट्रिकचे काम सुरू असल्याने रेल्वे इंजिन सतत साहित्याची ने-आण करण्यासाठी धावत असते. सदर इंजिन नगरवरून येत असताना या शेतकऱ्याला जोराची धडक दिल्याने त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच, अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन सदर मृतदेह हा कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments