मुंडेना राज्यसभेची उमेद्वारी मिळावी यासाठी मोहटादेवीला साकडे !


पाथर्डी - भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांना भाजपा पक्षांच्या वतीने राज्यसभेची उमेदवारी मिळून त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून याव्यात यासाठी पाथर्डी तालुक्यातील ओबीसी नेते दिलीप खेडकर यांच्यासह मुंडे कुटुंबावर प्रेम असलेले भाविकांनी मोहटादेवी येथे महापूजा करून मोहटा देवीला साकडे घालत आरती केली.

यावेळी ओबीसी नेते दिलीप खेडकर यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी जलक्रांती अभियाना अंतर्गत पाट पाणी आणण्याच्या चळवळीला यश प्राप्त व्हावे यासाठी देखील मोहटा देवीला साकडे घालत संकल्प केला. दोनही संकल्प पूर्तीनंतर मोहटा देवीला चांदीचा रत्नजडित मुकुट अर्पण करणार असल्याचे तसेच पंकजाताई मुंडे या खासदार झाल्यानंतर त्यांची पाथर्डी तालुक्यात भव्य मिरवणूक काढून पेढे तुला करणार असल्याची माहिती खेडकर यांनी पत्रकारांना दिली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा पक्ष खेडोपाडी पोहच करण्यासाठी तसेच पक्षाच्या ध्येय धोरनांचा प्रसार करण्यासाठी मोठा संघर्ष केला मात्र पक्ष सत्तेत आल्या नंतर मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाले त्यामुळे ओबीसी समाजाच्या नेतुत्वात पोकळी निर्माण झाली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ओबीसी सह बहुजन नेतुत्वाची धुरा सांभाळली त्यातूनच त्याची शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेशी विशेष नाळ जोडली गेली असून जनतेच्या मनात मुंडे कुटुंबावर विशेष प्रेम असल्याचे राजकीय व सामाजिक पटलावर अधोरेखित झालेले आहे.

मात्र सत्ता असूनही भाजपा पक्षा कडून पंकजा मुंडे यांना राजकीय पटलावर योग्य संधि दिली जात नसल्याने मुंडे प्रेमी जनते मध्ये नाराजी पसरल्याचे चित्र तयार झाले आहे. राजकीय पटलावर पंकजा मुंडे यांची भूमिका भाजपा स्पष्ट करत नाही मात्र नुकत्याच येवू घातलेल्या राज्यसभेच्या खासदार जागेसाठी भाजपने पंकजा मुंडे यांना संधि द्यावी अशी मागणी तमाम ओबीसी बांधवातून व्यक्त होत आहे.

यावेळी ह.भ.प.अजिनाथ आंधळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर, परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मनोरमा खेडकर,तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे,तालुका उपाध्यक्ष अमोल गर्जे,शहर अध्यक्ष अजय भंडारी, मा जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल नाना खेडकर, अजिनाथ खेडकर यांच्यासह तालुक्यातील मुंडे परिवारावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते.

     

Post a Comment

0 Comments