पाथर्डीत शेकडो कावळ्यांचा गूढ मृत्यू !


पाथर्डी - शहर आणि परिसरात गेल्या ८ दिवसापासून अदृश्य कारणामुळे कावळ्यांचा मृत्यू होत असून निसर्गचक्रातील महत्त्वाच्या घटकाचा अंत होत असल्याने वन्यप्रेमी मध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने कावळा पक्षाच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मृत्यूच्या कारणाची शोध घेऊन पर्यावरणाची होणारी हानी थांबवावी अशी मागणी होत आहे.

गेली ८ दिवसापासून पाथर्डी परिसरात अनेक कावळे बेशुद्ध होऊन पडत आहेत व थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू होत आहे. परिसरात पक्षी तज्ञ अथवा पक्षांवर उपचार करण्याची यंत्रणा नसल्याने कावळ्यांच्या मृत्यूबाबत गुढ कायम आहे.

Post a Comment

0 Comments