पाथर्डी बुधवार
बाजारात भाजी बाजार करण्यासाठी निघालेल्या मुस्लिम महिलेला न्यायालयीन कर्मचारी
असल्याचे बनावट ओळखपत्र गळ्यात घालून सुटा बुटातील तोतया न्यायालयाच्या
कर्मचाऱ्यांनी तिच्या कुटुंबाची ओळख सांगून पतीचे नावे न्यायालयात ३० हजार
रुपये आले असून ते तुम्हास मिळवण्यासाठी न्यायालयात
फोटो द्यावा लागतो असे सांगून महिलेला शहरातील फोटो स्टुडिओमध्ये नेऊन फोटो
काढताना दागिने दिसले नाही पाहिजे, दागिने पिशवीत घालून ठेवा व न्यायालयातील काम
झाले की दागिने पुन्हा आपण घेऊन जाऊ अशी बतावणी करून वृद्ध महिलेला पाथर्डी
न्यायालयाच्या आवारात नेहले. महिलेला क्रमांक १ न्यायालयाच्या कक्षा समोर बसवून तोतया
न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी न्यायालयात फारशी गर्दी नसल्याचा गैरफायदा घेत महिलेची
नजर चुकवून महिलेला न्यायालयात सोडून फोटो स्टुडिओमध्ये जाऊन दागिने असलेली पिशवी
घेऊन पोबारा केला आहे. बराच वेळ गेल्या नंतर महिलेने सदरील तोतया इसम न्यायालयात
सापडत नसल्याने फोटो स्टुडिओमध्ये जाऊन आपल्या दागिन्या बाबत चौकशी केली असता तेथून
तोतया इसम दागिने घेऊन गेल्याचे समजले त्यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात तिची फसवणूक
झाल्या बाबत फिर्याद दाखल केली आहे.
जीन्स पॅन्ट,शर्ट
इन करून तोंडाला काळे मार्क्स लावून रुबाबात न्यायालयीन कर्मचारी असल्याचे ओळखपत्र
गळ्यात लटकवून न्यायालयात नेहून महिलेला लुटणारा व फसवणूक करणारा आरोपी नेमका कोण
असा प्रश्न नागरिक विचारत असून भर न्यायालयात महिलेला नेऊन सफाईदारपणे फसवणूक
करणारा तो आरोपी शोधण्याचे आव्हान पाथर्डी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
0 Comments